करोडोची रोल्सरॉईल्स विकत घेण्यापेक्षा तो पैसा कामगारांना देण्यात समाधानी

सातारा : अनेक उद्योजक आपल्यासोबत काम करणाऱ्या कामगारांचा विचार न करता स्वतः च्या सुखाचा विचार करतात, पण साताराच्या मातीचे फरोख नरिमन कूपर मात्र वैयक्तिक महागड्या गाड्या अथवा चैनीच्या वस्तू घेण्याऐवजी उद्योगाच्या १०० व्या वर्षी तो पैसा कामगारांना अनुदान म्हणून देतात, हे अनोखे उदाहरण आहे. नुकतेच फरोख नरिमन कूपर यांनी उद्योगाच्या शताब्दी वर्षानिमित्त २२२० कामगारांना प्रत्येकी रूपये दहा हजाराचे अनुदान देऊन कामगारांना सुखद धक्का दिला. कामगार व कामगार प्रतिनिधींनी नवरोज व गुढी पाडव्याला मिळालेल्या या भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

कामगारांना उद्देशून लिहिलेल्या पञात फरोख कूपर म्हणतात, कूपर उद्योग समूह १०० वर्ष पूर्ण करून एका नव्या पर्वाला सुरूवात करत आहे. या शताब्दी वर्षाच्या शुभ घडीवर, आजमितीस कामावर असणाऱ्या सर्व कामगारांसाठी एकवेळ खास फक्त या वर्षासाठी अनुदान १० हजार रूपये जाहीर करण्यात मला अत्यानंद होत आहे.

उद्योगाच्या भरभराटीस आपल्या सर्वांचे व आधीच्या पिढ्यांचे सहस्त्र हात लागलेले आहेत. आमचे आजोबा, सर पनजीशा कूपर यांनी सातान्यातील स्थानिक लोकांना बरोबर घेऊन हा उद्योग उभा केला. कूपर उद्योग समूह सातारासारख्या ग्रामीण भागात आपली पाळेमुळे जोडून उभारला, त्यामध्ये सर्व कामगार व कर्मचारी यांचा मोठा वाटा आहे. जामच्या उद्योगाच्या प्रगतीबरोबरच आपल्या सर्वांची आर्थिक व सामाजिक उन्नती व्हावी, हा आमच्या समाजशील उद्योगाचा गाभा राहिला आहे.

मी अभिमानाने सांगू इच्छितो की, आज कूपर उद्योगात आजूबाजूच्या ५० कि.मी. परिघातील सर्व स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे  साताऱ्यातील बऱ्याच उद्योगांमध्ये मोठ्या संख्येने बाहेरील परप्रांतीय कामगार आणून त्यांना काम दिले जाते, परंतु आम्ही मात्र या मातीची नाळ तोडली नाही. परस्परांवरचा विश्वास व स्नेह यातून आपण एकञ प्रगती करत आलो आहोत. आमचे आजोबा सर धनजीशा कूपर यांनी फक्त कूपर उद्योगाचा पाया घातला नाही तर त्याकाळी ते एक समाजसुधारक तसेच राजकारणी होते. सातारा नगरपरिषदेचे १० वर्षे अध्यक्ष तर १९३७ मध्ये तत्कालीन बॉम्बे प्रेसिडन्सी इलाख्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केले आहे. त्यांनी त्याकाळी देशातील पहिले डिझेल इंजिन बनविले आहे.

माझ्या ५६ वर्षाच्या या प्रवासात तुम्हा सर्वांच्या प्रेमाचे बळ मिळाले आहे. मी साताऱ्याच्या आजूबाजूला फिरावयास गेलो की, त्या भागातील लोक मला आदराने नमस्कार करून आपल्यामुळे निर्माण झालेल्या रोजगाराबद्दल समाधान व्यक्त करतात. आम्ही करत असलेल्या सामाजिक मदतीचा अभिमानाने उल्लेख करतात. नांगराच्या फळापासून सुरू झालेला हा उद्योग आज इंजिन कॉम्पोनंट, ३ एच.पी. ते ६०३ एच. पी. इंजिन व ट्रक्टर बनवितो, सर्व मोठ्या देशातील

कंपन्यांना आपण आपला उत्कृष्ट दर्जाचा माल कामगारांसाठी क्रेडिट सोसायटीमार्फत, कामगार पुरवतो. नुकतेच दक्षिण आशिया व आशियाई देशातील अग्रगण्य असणाऱ्या इंडियन मशीन टुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन या संस्थेने सर धनजीशा कूपर यांचा वर कॉफी टेबल बुक व लघु चित्रफीत प्रसारित करून सन्मान केला. माझे आजोबा या संस्थेचे संस्थापक सदस्य व अध्यक्ष होते, हे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

आज आपल्या उद्योगातील कामगारांना संकटांच्या वेळी मदतीचा हात दिला जातो. कोविडच्या कठीण काळात फैक्टरी बंद असताना कामगारांच्या उदरनिर्वाहासाठी, कोणतेही शासकीय आदेश नसताना, भत्यासह मूळ पगार चालू ठेवला. कोविड लस महाराष्ट्रात उपलब्ध नसताना वरच्या पातळीवर प्रयत्न करून लसीकरणाचे केंद्र फॅक्टरीत आणून जून २०२१ व जुलै २०२१ मध्ये १०० कामगार कर्मचाऱ्याचे दोन लसीचे लसीकरण करून आरोग्याची काळजी घेतली..

कामगारांसाठी क्रेडिट सोसायटी मार्फत व त्यांच्या कुटुंबीयांसाठी नरिमन कूपर ट्रस्ट मार्फत कामगाराच्या कुटुंबातील स्त्रियांना आर्थिक उन्नतीसाठी होमाई कूपर उद्योग या मार्फत गेली कित्येक वर्षे कार्य होत आहे. कामाच्या ठिकाणी आपण कोणताच भेदभाव करत नाही. सर्व कामगार व कर्मचारी यांच्या पाल्यांसाठी वर्षातून दोनदा शिबिर भरवतो. पाल्यांना शिष्यवृत्ती व बक्षिसे देऊन त्यांची शिक्षणाच्या प्रती ओढ वाढवतो. आज जवळपास ३०० पेक्षा जास्त कामगार व कर्मचारी माझ्या सोबत गेली २५ वर्ष काम करीत आहेत, याचा मला मोठा अभिमान वाटतो. आमच्याकडे कामगारांनी स्वतः एकञ येवून उभारलेल्या अजिंक्य स्वयंरोजगार संस्थेच्या माध्यमातून कायम रोजगार मिळतो व कौशल्ये शिकून आर्थिक उत्पन्न क्षमता वाढवता येत आहे. यापुढे सर्वांच्या सहकार्याने उद्योगाची सतत प्रगती होत राहील असा मला विश्वास वाटतो.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला