मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. श्री संजयजी देशमुख आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री श्रीकांतजी भोसले यांचा सत्कार समारंभ श्रीपतराव पाटील हायस्कूल मध्ये पार

सातारा : करंजे येथील ' शिक्षण प्रसारक संस्था' करंजे पेठ सातारा यांच्यावतीने सातारा जिल्ह्याचे नावलौकिक वृद्धिंगत करणारे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. श्री संजयजी देशमुख साहेब आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश मुंबई येथील मा. श्री श्रीकांतजी भोसले साहेब यांचा सत्कार समारंभ संस्थेच्या श्रीपतराव पाटील हायस्कूल मध्ये मोठ्या आनंदात पार पडला.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नवीन इमारतीचे उद्घाटन झाले.
    कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री श्रीकांतजी भोसले यांनी "शिक्षण ही सतत वाढत जाणारी संपत्ती असून त्यात उत्तरोत्तर वाढ करावी "असे वक्तव्य केले.
    कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उत्कृष्ट वक्ते मा.श्री संजय देशमुख साहेब यांनी भाषणाच्या सुरुवातीला आपल्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना "नोकरी करणारे न बनता नोकरी देणारे बना" असा मोलाचा सल्ला दिला.तसेच त्याग, प्रामाणिकपणा,चिकाटी, गुरुजनांविषयी आदर हे गुण प्रत्येकाने जोपासावेत असे वक्तव्य केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष सहभागातून व मनोरंजनात्मक खेळातून जीवनात यशस्वी होण्याचे मार्ग पटवून दिले.
   कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री सदाभाऊ कुंभार,उपाध्यक्ष मा.श्री जगन्नाथ किर्दत, मा.नंदकिशोर जगताप,संस्थेचे सचिव मा.श्री तुषार पाटील,चेअर पर्सन सौ. वत्सला  डुबल व सर्व संस्था संचालक, देणगीदार श्री.नंदकुमार शेंडे पालक वर्ग, माजी शिक्षक, प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका सौ प्रतिभा यादव यांनी केले.श्रीपतराव पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री वसावे  सर यांनी आभार मानून कार्यक्रम पार पडला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला