लोकनेते कै. बाळासाहेब देसाई यांचे साताऱ्यात प्रेरणादायी स्मारक उभारण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार ... खा. उदयनराजे
Satara News Team
- Fri 24th Nov 2023 07:59 pm
- बातमी शेयर करा
सातारा : साताऱ्यात गेल्या काही दिवसापूर्वी लाेकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकावरून वाद निर्माण झाला होता.आता लोकनेते कै. बाळासाहेब देसाई यांचे साताऱ्यात प्रेरणादायी स्मारक उभारण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार आहे. याकामी जरुर त्या संबंधितांशी चर्चा करून, स्मारकाचे ठिकाण एकमताने निश्चित केले जाईल. लोकनेते कै. बाळासाहेब देसाई यांच्या महान कार्यास साजेल असे स्मारक उभारण्यात येईल, असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले लाेकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकावरून वाद निर्माण झाला होता. पण आता खासदार उदयनराजे भोसले यांनी यामध्ये सर्व समावेशक भूमिका घेऊन या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावणार आहेत. उदयनराजे यांनी म्हटले की, राज्याचे तत्कालीन महसूलमंत्री कै. बाळासाहेब देसाई यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात अत्यंत धाडसाने, तळमळीतून निर्णय घेऊन राज्यभरात लोकहिताची विविध सामाजिक कामे केली.
कै. बाळासाहेब देसाई यांचे एकूणच सामाजिक आणि राजकीय कार्य अत्यंत उत्तुंग होते. म्हणूनच त्यांना लोकनेते ही बिरुदावली समाजाने बहाल केली. अशा अलौकिक व्यक्तिमत्त्व लाभलेल्या कै. बाळासाहेब देसाई यांचे सातारा मुख्यालयाच्या ठिकाणी साकारणाऱ्या नियोजित स्मारकाचा विषय विवादीत न होता तो एकमताने पूर्णत्वास जाणे गरजेचे आहे.
पालकमंत्री आणि लोकनेते कै. बाळासाहेब देसाई यांचे नातू शंभूराज देसाई यांच्यासह सर्व संबंधित लोकप्रतिनिधी, पक्षनेते, संघटना आदींशी विचारविनिमय करून स्मारकाचे ठिकाण सुनिश्चित करण्यासाठी पुढाकार घेणार आहोत. त्याकरिता जे काही करायला लागेल ते सर्वांच्या प्रयत्नामधून केले जाईल, असे उदयनराजे यांनी नमूद केले आहे.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 24th Nov 2023 07:59 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 24th Nov 2023 07:59 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Fri 24th Nov 2023 07:59 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Fri 24th Nov 2023 07:59 pm
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Fri 24th Nov 2023 07:59 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Fri 24th Nov 2023 07:59 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 24th Nov 2023 07:59 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Fri 24th Nov 2023 07:59 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Fri 24th Nov 2023 07:59 pm
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Fri 24th Nov 2023 07:59 pm









