शशिकांत शिंदेंसोबत त्यांच्या घरातले लोकसुद्धा नाहीत; आमदार महेश शिंदेंनी डिवचलं
Satara News Team
- Mon 5th Jun 2023 06:27 pm
- बातमी शेयर करा
सातारा : साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधु ऋषिकेश शिंदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या घटनेनंतर सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. याबाबत एका वृत्तमाध्यमाने शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला आता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. "आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ ऋषिकांत शिंदेंनी काल पक्षात प्रवेश केला. आ. शिंदे यांच्यासोबत त्यांच्या घरातीलही कोणी जाणार नाहीत. शेवटी कोण किती काम करतंय हे पाहिलं जात," असे सांगत महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदेंवर निशाणा साधला.
मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी काल ऋषीकेश शिंदे यांच्यासोबत काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. ऋषिकांत शिंदेंच्या पक्षप्रवेशाबाबत आमदार महेश शिंदे यांनी मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, सातारा जिल्ह्यात शिंदे गटाच्या माध्यमातून पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पक्षात कोणाला घ्यायचे याबाबत मुख्यमंत्री स्वतः निर्णय घेतात. ते जे आदेश करतात त्याचे आम्ही पालन करतो. आम्ही आमदार असल्यामुळे आमच्या तालुका पुरताच विचार करतो. शेवटी मुख्यमंत्री शिंदे जो काय तो निर्णय घेतात.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Mon 5th Jun 2023 06:27 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Mon 5th Jun 2023 06:27 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 5th Jun 2023 06:27 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 5th Jun 2023 06:27 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 5th Jun 2023 06:27 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 5th Jun 2023 06:27 pm
संबंधित बातम्या
-
पदांसाठी मुलाखतींना चंद्रकांत जाधव यांचा कडाडून विरोध
- Mon 5th Jun 2023 06:27 pm
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Mon 5th Jun 2023 06:27 pm
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 5th Jun 2023 06:27 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Mon 5th Jun 2023 06:27 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Mon 5th Jun 2023 06:27 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Mon 5th Jun 2023 06:27 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Mon 5th Jun 2023 06:27 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Mon 5th Jun 2023 06:27 pm













