निष्क्रिय, बिनकामाच्या आमदारांविरोधात जनतेत लाट
- वाठार जिल्हा परिषद गटात मनोजदादांनाचे स्वागतSatara News Team
- Wed 13th Nov 2024 02:41 pm
- बातमी शेयर करा
देशमुखनगर : कराड उत्तरला कमळ चिन्ह मिळाले, एकास एक लढत आणि मनोजदादा घोरपडे यांच्यासारखा सक्षम चेहरा आहे त्यामुळे विक्रमी मतांनी परिवर्तन करायचे आहे. महायुती शासनाच्या योजना थेट लोकांपर्यंत पोहोचल्या. अवघ्या अडीच वर्षाच्या कालावधीत मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची विकास कामे मार्गी लागली जी इथल्या आमदारांना २५ वर्षात जमली नाहीत तरीही यांना विकासासाठी पुन्हा संधी हवी आहे.
उलट कराड उत्तरचे नाकर्ते, निष्क्रिय आमदार शासनाच्या योजना फसव्या असल्याचे सांगत सुटलेत. या योजना फसव्या आहेत का असा सवाल भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी केला. वाठार (कि.) ता.कोरेगाव येथे कराड-उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचारार्थ वाठार जि.प.गटाचा गावभेट दौऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाठार येथे भव्य प्रचार रॅली काढण्यात आली.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, रहिमतपूर मंडल अध्यक्ष भीमरावकाका पाटील, रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष संपतराव माने, वासुदेव माने अध्यक्ष राजेंद्र घाडगे, राष्ट्रवादीचे नेते सचिन बेलागडे, उपाध्यक्ष गणेश घोरपडे, सरपंच सुनील कांबळे, उपसरपंच सुनंदा गायकवाड, ज्येष्ठ नेते मुरलीधर गायकवाड, तसेच महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.वाठार किरोलीसह सुर्ली, पिंपरी, साप, बेलेवाडी, वेळू, पवारवाडी, जयपूर, कोंबडवाडी, मुळीकवाडी, नागझरी, आर्वी, साठेवाडी येथील ग्रामस्थांनी मनोजदादांना मताधिक्य देण्याचा निर्धार केला. २३ तारखेला डोळ्यात आनंदाश्रु आणि डोक्यावर गुलाल असणार अशा भावना यावेळी कार्यकर्तांनी व्यक्त केल्या. धैर्यशील कदम पुढे म्हणाले, आमचे कार्यकर्ते रात्रंदिवस काम करत आहेत. ते लोकांच्यासाठी झटतात, शासनाच्या योजणांचा तुमच्यापर्यंत लाभ मिळवून देतात हे चुकीचे आहे का? निवडणूकीत याचे उत्तर तुम्हीच उत्तरच्या निष्क्रिय आमदारांना मतातून द्या. आता त्यांच्या पोटात पोटसुळ उठले आता पुढे कसे व्हायचे लोक भाजप महायुतीला मतदान करतील हे निश्चित झाले आहे. पण यांच्या घरात आपण २५ वर्षे झाली गुलामी करतोय हे आणखी किती दिवस याचाही अभ्यास कुठेतरी केला पाहिजे. काम करणारा माणूस चुकत असतो पण बिन कामाचा चुकत नाही म्हणून तर कराड उत्तरेत २५ वर्षे झाले एकच बिनकामाचा आहे अशी टीका धैर्यशील कदम यांनी केली.
अडीच वर्षे मंत्रीपदकाळात केलेले एक काम दाखवा असा सवाल करत आता भाजपने आणलेल्या कामांना मी आणले म्हणून तोरा मिरवत आहेत हे कदापिक खपवून घेतले जाणार नाही. आज सगळ्यांनी संघटित झाले पाहिजे विकासाची दिशा बदलायची असेल तर येणारी विधानसभेत महायुती सरकार येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भाजप महायुती सरकारने महिला, शेतकरी युवकांसाठी चांगल्या योजना आणल्या आहेत. लाडकी बहीण योजना, किसान सन्मान योजना, बांधकाम कामगार योजना, मुलींसाठी मोफत शिक्षकांची सोय, महिलांना सवलतीच्या दरात एसटी प्रवास अशा अनेक योजना यशस्वीपणे या सरकारने राबवल्या आहेत असे धैर्यशील कदम म्हणाले.
विक्रम पावसकर म्हणाले, ही निवडणूक महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारी आहे. सर्वानी एकत्र येण्याचा निश्चय करा कारण एकजुटीतच आपले हित आहे. एकजुट हीच खरी ताकद असून मनोजदादा घोरपडे यांच्या पाठीशी उभे रहा. रामकृष्ण वेताळ म्हणाले, महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांना मिळत असलेला प्रतिसाद हा जनतेतून झालेला उठाव आहे. भारतीय जनता पार्टी तळागाळातील लोकांचा विचार करून शासनाच्या योजना राबवते. यावेळी भीमराव पाटील यांनी बोलताना वाठार गटातून मनोजदादांना मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला. वासुदेव माने, सचिन बेलागडे यांनी मनोगत व्यक्त केले.
दुर्बीण घेऊन विकास शोधावा लागतो
मनोजदादा विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे असे आमदार बाळासाहेब पाटील भाषणात सांगतात यांच्या या निरंतर प्रक्रीयेने २५ वर्षात साध्या मूलभूत गरजा पुर्ण होवू शकला नाहीत. यांनी केलेला विकास दुर्बीण घेऊन शोधावा लागतो. उलट यांचे ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर यांचा निरंतर विकास चालू आहे. कराड उत्तर मतदारसंघात येणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील गावांचा पाणी प्रश्न १५ वर्षात सोडवता आला नाही. रस्ते, गटर, पिण्याचे पाणी, यासारख्या मुलभूत प्रश्नांवरही काम झाले नाही अजून यांना कसला विकास करायचा आहे. यांच्याकडे एखादा प्रश्न गेला तर माझ्या अखत्यारीत नाही जावा आंदोलन करा, मी आंदोलनाला भेट देतो अशी उत्तरे देतात मग कशाला असला बिनकामाचा आमदार पाहिजे. असा सवाल महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांनी केला.
आमचे काम निवडणुकीपुरता तर ते सामाजिक भावनेतून सुरू आहे. उत्सव लोकशाहीचा... पिंपरी ता. कोरेगाव येथे ग्रामस्थ व लाडक्या बहिणींनी फेटे बांधून मनोजदादा घोरपडे यांचे जोरदार स्वागत केले या स्वागताने मनोजदादांसह गावात आलेले इतर मान्यवर भारावून गेले. शेकडो महिला ग्रामस्थांनी गावातून घोषणा देत प्रचार रॅली काढली. यावेळी महिला ग्रामस्थांसह आनंदराव साबळे विष्णू शांत कणसे, ऋषीकेश तुपे, सुरेश भोसले, युवराज घाडगे, आप्पासो पवार पै तानाजी पवार, संतोष साखरे, शंकर साखरे, साबळे गुरुजी, श्रीकांत फडतरे, दादासाहेब पवार, शामराव निकम, सावंत बापू अंकुश बापू, जगन्नाथ सोनवणे, प्रवीण कदण गणपत पवार, सचीन कुलकर्णी, नुर महम्मद इनामदार, हिंदुराव घाडगे, ज्ञदिपक तरटे, राजेंद्र पवार, राजेंद्र सोनावणे, प्रकाश बळवंत पवार, अमोल कदम, शरद जाधव, अमोल कदम, बळवंत कणसे, उध्दव कदम व ग्रामस्थ उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Wed 13th Nov 2024 02:41 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 13th Nov 2024 02:41 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 13th Nov 2024 02:41 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 13th Nov 2024 02:41 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 13th Nov 2024 02:41 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 13th Nov 2024 02:41 pm
संबंधित बातम्या
-
पदांसाठी मुलाखतींना चंद्रकांत जाधव यांचा कडाडून विरोध
- Wed 13th Nov 2024 02:41 pm
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Wed 13th Nov 2024 02:41 pm
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 13th Nov 2024 02:41 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Wed 13th Nov 2024 02:41 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Wed 13th Nov 2024 02:41 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Wed 13th Nov 2024 02:41 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Wed 13th Nov 2024 02:41 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Wed 13th Nov 2024 02:41 pm













