खोजेवाडी येथील अपघातातील जखमीचा मृत्यू

ओम्नी व स्विफ्ट कारचा झाला होता अपघात

नागठाणे : रविवारी दुपारी देशमुखनगर ते खोजेवाडी (ता.सातारा) दरम्यान अँटलांटा पट्रोल पंपाजवळ मारुती ओम्नी व स्विफ्ट कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातातील गंभीर जखमी झालेल्या यशवंत दिनकर धुमाळ (वय.५८,रा.कल्याण पार्क अपार्टमेंट, फॉरेस्ट कॉलनी,विलासपूर,सातारा) यांचा रात्री उशिरा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.ते संभाजीनगर ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते.
        रविवारी  देशमुखनगर येथील मंगल कार्यालयात एक कार्यक्रम होता.या कार्यक्रमाला यशवंत धुमाळ हे पत्नी सिंधू धुमाळ व मुलगा कार्तिक यांच्यासह त्यांच्या मारुती ओम्नी व्हॅनने आले होते.कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी ते परत सातारा येथे निघाले होते.त्यांची व्हॅन देशमुखनगर ते खोजेवाडी दरम्यान असलेल्या अँटलांटा पेट्रोल पंपाजवळ आली असता पुढून भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिली.
       अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला होता.या अपघातात यशवंत दिनकर धुमाळ, सिंधू यशवंत धुमाळ, कार्तीक यशवंत धुमाळ (रा. सातारा) व स्विफ्ट कारमधील शिवनाथ साळुंखे, अमोल साळुंखे (रा. नागठाणे.ता.सातारा), प्रतीक्षा कृष्णत घाडगे (रा. फत्यापूर,ता.सातारा) हे जखमी झाले होते.या सर्व जखमींना ग्रामस्थांनी तात्काळ उपचारासाठी सातारा येथे पाठवले होते.त्यापैकी यशवंत धुमाळ व त्यांच्या पत्नी सिंधू धुमाळ गंभीर जखमी झाले होते.त्यांच्यावर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
        रविवारी रात्री उशिरा उपचार सुरू असताना यशवंत धुमाळ यांचा मृत्यू झाला.या अपघाताची बोरगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलिसांनी स्विफ्ट कारचालक शिवनाथ परशुराम साळुंखे (रा.नागठाणे, ता.सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास अपघात विभागाचे हवालदार विजय देसाई व प्रकाश वाघ करत आहेत

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला