दिवाळीच्या पूर्वसंध्येला दिपलक्ष्मीमध्ये गाजलेल्या गीतांची मैफिल रंगणार !
Satara News Team
- Tue 18th Oct 2022 12:40 pm
- बातमी शेयर करा
सातारा : दिपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने दिवाळीच्या पूर्वसंध्येला, "दीपावली संध्या" या कार्यक्रमात हिंदी व मराठीत गाजलेल्या गीतांची मैफिल शुक्रवार दि.२१ रोजी सायंकाळी दिपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहात रंगणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र पाटील, अनिल वीर,शिरीष चिटणीस,सागर पावसे,सतीश नेवसे व विनायक भोसले आहेत."नवी स्वप्ने नवी क्षितिजे,घेऊन येवो ही दिवाळी, ध्येयार्पण प्रयत्नाना,दिव्ययशाची मिळो झळाळी,आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो,ही दिवाळी ..." या पद्धतीने सभासद,खातेदार व हितचिंतकाना पतसंस्थेचे शुभेच्छा दिलेल्या आहेत.सदरच्या कार्यक्रमात मुकुंद पांडे,अरुण कुलकर्णी,सौ.विजया चव्हाण, सौ.ज्योत्स्ना खुटाळे, ऍड. लक्ष्मीकांत अघोर,सौ.प्रिया अघोर,ऍड.आशुतोष वाळिंबे व सौ.रेश्मा वाळिंबे या कलाकारासह सुभाष कुंभार यांची ध्वनी व्यवस्था आहे. याकामी,पतसंस्थेचे संस्थापक - चेअरमन शिरीष चिटणीस,मुख्य शाखेचे अधिकारी लक्ष्मण कदम, व्यवस्थापक विनायक भोसले, व्हाईस चेअरमन सौ.सुरेखा रानडे व कर्मचारीवृंद अथक असे परिश्रम घेत आहेत.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 18th Oct 2022 12:40 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 18th Oct 2022 12:40 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 18th Oct 2022 12:40 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 18th Oct 2022 12:40 pm
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Tue 18th Oct 2022 12:40 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Tue 18th Oct 2022 12:40 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 18th Oct 2022 12:40 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Tue 18th Oct 2022 12:40 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Tue 18th Oct 2022 12:40 pm
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 18th Oct 2022 12:40 pm









