हजारो मशालींनी उजळून निघाला किल्ले अजिंक्यतारा
शिवजयंती महोत्सवाचा दुसरा दिवस; लेजर शोने शहर निघाले न्हाऊनSatara News Team
- Mon 19th Feb 2024 11:23 am
- बातमी शेयर करा
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आ. श्रीमनी छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, रविवारी रात्री किल्ले अजिंक्यतारावर मशाल महोत्सव आणि लेजर शोचे आयोजन करण्यात आले. यामुळे किल्ले अजिंक्यतारा हजारो मशालींनी उजळून निघाला तर सातारा शहर लेजर शोच्या प्रकाशात न्हाऊन निघाले.
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती महोत्सव समिती यांच्यावतीने रविवारी किल्ले अजिंक्यतावर मशाल महोत्सव, सुनील लाड (कवलापूर, सांगली) यांचे व्याख्यान आणि विविध संस्था व व्यक्तींचा सन्मान सोहळा उत्साहात झाला. या कार्यक्रमाला आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, अनेक मान्यवर, असंख्य कार्यकर्ते आणि हजारो शिवप्रेमी उपस्थित होते. रात्री सातच्या सुमारास युवक व युवतींचे जथ्थेच्या जथ्थे हातात मशाली घेऊन गडावर आले. गडावर सर्वत्र हे मावळे हातात मशाल घेऊन उभे राहिले. यानंतर एक- एक मशाल पुटु लागली आणि हजारो मशाली गडाच्या सर्व तटबंदीवर पेटल्या. यामुळे अजिंक्यतारा उजळून निघाला.
किल्ल्यावरून सातारा शहरावर लेजर शो टाकण्यात आला. यामुळे सातारा शहर वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाशात न्हाऊन निघाले. गडावरील राज सदरेवर व्याख्याते सुनील लाड यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम उत्साहात झाला. लाड यांनी छत्रपती शिवरायांच्या विविध पराक्रम आणि कार्याचा लेखाजोखा व्याख्यानात मांडला. यावेळी कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्तींचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महोत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
चौकट- आज शाही मिरवणूक आणि महाआरती
दरम्यान, सोमवारी शिवजयंती दिनी सायंकाळी ४.३० वाजता राजवाडा, गांधी मैदान येथून महोत्सव समितीच्या वतीने शिव प्रतिमेची भव्य शाही मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत हत्ती, घोडे, उंट, विविध चित्ररथ सहभागी होणार आहेत. शिवतीर्थ पोवई नाका येथे मिरवणुकीची सांगता होणार असून रात्री ८.३० वाजता शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांची महाआरती होणार आहे. तसेच यावेळी फटाक्यांची आकर्षक आणि नयनरम्य आतिषबाजी केली जाणारा आहे. मिरवणूक आणि महाआरतीसाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी महोत्सव समितीच्या वतीने केले आहे.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 19th Feb 2024 11:23 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 19th Feb 2024 11:23 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Mon 19th Feb 2024 11:23 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Mon 19th Feb 2024 11:23 am
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Mon 19th Feb 2024 11:23 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Mon 19th Feb 2024 11:23 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 19th Feb 2024 11:23 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Mon 19th Feb 2024 11:23 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Mon 19th Feb 2024 11:23 am
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Mon 19th Feb 2024 11:23 am









