धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत अयोजित विशेष श्रमसंस्कार शिबीराचे उदघाटन....

सातारा : शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत रेनावळे,ता सातारा या गावामध्ये गुरुवार दि.27 जानेवारी ते 2 फेब्रुवारीअखेर सात दिवस *विशेष श्रमसंस्कार शिबीराचे* आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे उदघाटन आज गुरुवार दि.27 जानेवारी रोजी रोजी मा.श्री.अशोक पवार (कार्यकारी अभियंता,सिंचन विभाग,सातारा) यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळ कांबळे साहेब होते तर रेनावळे गावचे सरपंच मा.श्री.गणेश सणस यांची शिबीरास प्रमुख उपस्थिती होती. उदघाटन समारंभानंतर मा.श्री.अशोक पवार साहेबांनी आपल्या मनोगतातून शिबीरास शुभेच्छा दिल्या व अशा श्रमसंस्कार शिबिरातून संस्कारी युवक घडत असल्याच्या भावना व्यक्त केल्या तसेच पाणी प्रदूषनामुळे माणसाला विविध आजार होत असल्याचे विविध उदाहरणांमधून माहिती दिली. उदघाटन समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळ कांबळे साहेब यांनी आपल्या मनोगतात,महाविद्यालयामार्फत रेनावळे हे गाव तीन वर्षांसाठी दत्तक घेत असल्याचे जाहीर केले. शिबीराच्या उदघाटन समारंभास कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्र.कुलसचिव प्रा.डाॅ.विजय कुंभार सर,महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.डाॅ.विठ्ठल सावंत सर,वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयतील सर्व प्राध्यापक, ग्रामस्थ व राष्ट्रीय सेवा योजनेतील शिबीरामध्ये सहभागी स्वयंसेविका स्वयंसेवक उपस्थित होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रो.व्ही.डी.पाटील सर,कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा.उत्तम पाटील सर,सह समन्वयक प्रा.मोहन लेंगरे सर व रेनावळे गावचे सरपंच मा.श्री.गणेश सणस साहेब व स्थानिक ग्रामस्थ हे सातत्याने योगदान देत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला