कॉलर उडवने, मुलींसोबत डान्स करने हा त्यांचा वैयक्तिक आयुष्यातील प्रश्न .. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा

सातारा  :  केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे काल जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी जिल्ह्यात झाले. यावेळी त्यांचे भाजप कार्यकर्त्याच्यावतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांच्या कॉलर उडवण्याच्या व डान्स करण्याच्या प्रश्नावर उत्तर दिले. ‘तुम्ही कुणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू शकत नाही. त्यांनी राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर हे केलंय का? आमच्या पक्षाचे कार्यकर्ते, नेते हे पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमात शिस्तीचे पालन करतात. कुठल्याही व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रश्न विचारू शकत नाही,’ असे मिश्रा यांनी म्हंटले.


भाजपचे नेते तथा केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. मंत्री मिश्रा म्हणाले की, खासदार उदयनराजे भोसले हे कॉलर उडवतात, मुलींसोबत डान्स करतात हा त्यांचा वैयक्तिक आयुष्यातील प्रश्न आहे. कुणीही कुणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू शकत नाही. त्यांनी राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर हे केलंय का? आमच्या पक्षाचे कार्यकर्ते, नेते हे पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमात शिस्तीचे पालन करतात.

कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम हा सार्वजनिक असतो. त्या पक्षात जे कार्यकर्ते, नेते असतात त्यांचे वैयक्तिक आयुष्यही असते. पक्षाचे दहा लोक एकत्र भेटले हा त्यांचा वैयक्तिक कार्यक्रम असतो, असे मंत्री मिश्रा यांनी म्हंटले. यावेळी माध्यमांशी संवाद साधल्यानंतर मंत्री मिश्रा यांनी सातारा जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेत त्यांच्याशी अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा केली

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला