आधी बदलीचे आदेश, नंतर साताऱ्यात पोलिस अधीक्षक यांच्या बदली आदेशाला स्थगिती

सातारा : जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख आणि अपर पोलिस अधीक्षक ऑचल दलाल या दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काल, मंगळवारी रात्री नऊ वाजता आले. त्यानंतर काही वेळातच अधीक्षक समीर शेख यांच्या बदलीला स्थगिती देत असल्याचे आदेश शासनाने दिले. परंतु ऑचल दलाल यांच्या बदलीचा आदेश कायम आहे.

 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक समीर शेख यांची मुंबई शहरचे उपआयुक्त म्हणून नियुक्ती झाल्याचे तर त्यांच्या जागी ठाणे शहरचे पोलिस उपआयुक्त डाॅ. सुधाकर पठारे हे रुजू होणार होते. यासंदर्भात तसे आदेशही देण्यात आले. सोशल मीडियावरही बदलीचे आदेश व्हायरल झाले. परंतु रात्री उशिरा वरिष्ठ पातळीवर गतीने हालचाली झाल्या. रात्री साडेदहा वाजता अधीक्षक समीर शेख यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली. 

 

केंद्रीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, न्यायालय यांचे आदेश तसेच निवडणुकीची आदर्श आचारसंहिता विचारात घेऊन पुढील आदेशापर्यंत कार्यमुक्त करण्यात येऊ नये, असे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक ऑचल दलाल यांची समादेशक राज्य राखीव पोलिस बल पुणे येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी प्राचार्य पोलिस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथून आलेल्या अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांची नियुक्ती झाली आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला