सी-आर्म मशीनचा परिसरातील रुग्णांना फायदा होईल. -श्री नितिन पाटील

 वाई  : डॉ मनोहर ससाणे यांनी जीवनप्रकाश हॉस्पिटलमध्ये घेतलेल्या सी-आर्म् मशिनचा रुग्णांना निश्चितच लाभ होईल असे उद्गार सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा. श्री नितिन पाटील (काका) यांनी सी-आर्म् मशिनच्या उद्घाटन प्रसंगी काढले. पाचवड सारख्या ग्रामीण भागातून जीवनप्रकाश हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्ण सेवा करत असताना त्यांनी कायम आधुनिकतेची कास धरली. डिजिटल एक्स-रे मशीन, अद्यावत स्वराज मेडिकल स्टोअर्स, बायोबीम मशीन, ईसीजी मशिन्स, व्हॅक्यू-सक मशिन, इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्शन मशीन आणि आता सी-आर्म् मशीन या अद्यावत सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध केल्या. या सुविधांसाठी ग्रामीण भागातील रुग्णांना सातारा, पुणे सारख्या शहरात जावे लागत होते.   त्यामध्ये खर्चही वाढत होता आणि वेळही जात होता. डॉ मनोहर ससाणे यांनी या दोन्हींची बचत केली.
        खरेतर ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देत असताना अशा मोठ्या मशिन्ससाठी लाखो रुपयांची गुंतवणूक करणे धाडसाचे असते. पण डॉक्टर ससाणे यांनी तो विचार न करता आपले हॉस्पिटल अद्ययावत असावे आणि आपल्या ग्रामीण जनतेला तसेच अपघातग्रस्त रुग्णांना इथेच सुविधा मिळाव्यात ही तळमळ त्यांची दिसून येते.
याप्रसंगी बोलताना डॉक्टर
मनोहर ससाणे म्हणाले, जीवनप्रकाश हॉस्पिटल हे पुणे-सातारा या रहदारीच्या महामार्गावर असलेने येथे अपघाताची संख्याही जास्त असते. अपघातग्रस्त रुग्णांना यामुळे तातडीने वैद्यकीय सेवा मिळण्याच्या दृष्टीने पाचवड हे बाजारपेठेचे ठिकाण असलेने इथे अशा प्रकारचे सुसज्ज हॉस्पिटल असणे हे रुग्णांच्या दृष्टीने खूपच सोयीचे आहे. या सी-आर्म मशीनमुळे फ्रॅक्चर  झालेले पेशंट जीवनप्रकाश हॉस्पिटल येथेच बरे करता येतील, तसेच गुडघा आणि इतर सांधे, मानेचे आणि कंबरेचे मणके यावरील ऑपरेशन्सही या मशीनमुळे करता येतील.
        याप्रसंगी किसनवीर सह. साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री प्रमोददादा शिंदे, प्रतापगड सह. साखर कारखान्याचे संचालक मालोजीराव शिंदे, पाचवड ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ अर्चना विसापूरे, जीवनप्रकाश हॉस्पिटलचे एम डी श्रीयुत किशोर बोराटे, 
सौ अनिता ससाणे, सौ सारिका बोराटे, सोनिया बोराटे, माजी जि. प. सदस्य दिलिप बाबर, अशोक गायकवाड, डॉ स्नेहा जमदाडे, डॉ अंकुश शिंदे, डॉ रणजित गायकवाड, डॉ विकास फरांदे, डॉक्टर रमेश रांजणे, कृष्णातिरचे संपादक श्रीयुत कृष्णात घाडगे, तानाजी शिर्के, संतोष बोराटे, राजू शिंदे, समीर डांगे, देविदास शेवते, संतोष राक्षे,  प्रविण पवार, प्रमोद पवार, जितेंद्र पवार, श्री शैलेश भोसले, श्री गजानन भोसले, श्री जगन्नाथ नवले, श्री विलास पांडागळे, श्री रवींद्र जाधव, विजय तरडे, लक्ष्मण गायकवाड, समीर शेख, संजय चव्हाण आणि परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला