करंजे गावातील काही विघ्न संतोषी, असंतुष्ट लोकांनी विश्वस्त आणि तुषार साहेबराव पाटील यावर केलेले आरोप बिनबुडाचे, ... तुषार पाटील

सातारा  : करंजे गावातील काही विघ्न संतोषी, असंतुष्ट लोकांनी विश्वस्त आणि तुषार साहेबराव पाटील यावर बिनबुडाचे, कोणतीही माहिती न घेता खोटे आणि चारित्र्य हनन करणारे आरोप केलेले आहेत. त्या संदर्भात मी तुषार साहेबराव पाटील वैयक्तिक आणि विश्वस्त या नात्याने पुढील प्रमाणे वस्तूस्थिती मांडली आहे  सकाळी काही लोकांनी पत्रकार परिषद घेऊन  जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते सर्व दिशाभूल करणारे मुद्दे मांडलेले आहेत. श्री काळ भैरवदेव व इतर या विश्वस्त मंडळावर यापूर्वी माझे वडील कै.साहेबराव अनंतराव पाटील हे विश्वस्त होते त्यांचे दिनांक 2004 मध्ये त्यांच्या निधन झालं. त्यानंतर आमच्या कुटुंबाची शेत जमीन आणि नगरपालिका हद्दीतील काही जमीन नोंदी होण्यासाठी मा. तलाठी व तहसीलदार यांच्याकडे अर्ज दिलेला होता सदरच्या नोंदी वारसा हक्काने होणे संबंधी माननीय संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी कार्यवाही करत असताना श्री काळ भैरवदेव व इतर देव या विश्वस्त  संस्थेच्या सर्वे नंबर 413 चे जमिनीवर  चुकून नोंद झाली आणि सातबाराच्या इतर हक्कांमध्ये आमच्या कुटुंबातील आई, बहिणी आणि भावांची नोंद झाली. ही बाब 2011 मध्ये माझ्या लक्षात आल्यानंतर तातडीने मी 23/ 9/ 2011 मध्ये लिखित स्वरूपामध्ये माननीय तहसीलदार यांच्याकडे मी स्वतःहून अर्ज करून देवस्थान विश्वस्त मालकीच्या स. न .413 मधील सात बाराला जी चुकीची वारस नोंदी झालेली आहेत त्या रद्द करण्यासंदर्भात अर्ज दिलेला होता. यानंतर 2011 ते 13 पर्यंत वाट पाहूनही सदरची नोंद रद्द न झाल्याने मी पुन्हा 1/4/ 2013 रोजी माननीय तहसीलदार यांना  सदरच्या नोंदी रद्द व्हाव्यात म्हणून  अर्ज दिलेला होता. यानंतर माननीय तहसीलदार यांनी तत्कालीन सर्कल यांना आमच्या कुटुंबीयातील सर्व लोकांचे जबाब घेण्याचे आदेश दिले यानंतर त्यावेळी चे सर्कल श्री चंद्रकांत उतेकर यांनी आमच्या घरी येऊन आमच्या सर्व कुटुंबीयांचे जबाब घेतले होते त्या जबाबात आमच्या कुटुंबातील सर्व सभासदांनी स्पष्टपणे सांगितलेले होते की ही जमीन आमची नाही, ह्या जमिनीवर कोणताही आमचा हक्क नाही, आम्हाला सदरची जमीन नको आहे. त्यामुळे या जमिनीवरचं चुकून लागलेली नावे कमी करावी असा जबाब सर्कल यांच्याकडे दिलेला होता. यानंतरही दप्तर दिरंगाई असेल किंवा अन्य कोणतेही कारण असेल पुढील कार्यवाही झाली नसल्याने मी स्वतःहून दिनांक 10/10/2018 रोजी पुन्हा माननीय तहसीलदार यांच्याकडे सदरच्या जमिनीवरील नोंदी कमी कराव्यात यासाठी पुन्हा अर्ज दिला व वैयक्तिक भेटही घेतली. यानंतर पाच ते सहा महिने तारखा चालल्या त्यानंतर कोरोना आल्यामुळे कामकाज थांबले. करोना गेल्यानंतर मी पुन्हा 19/ 7/ 2023 ला तहसीलदार निर्णय देत नाही म्हणून मे. प्रांत अधिकारी साहेब यांच्याकडे अपील दाखल केले सदर अपीलाची सुनावणी होऊन  दिनांक 13/ 9 /2023 रोजी फेरफार क्रमांक 2473 मध्ये जी चुकीची नोंद झालेली होती ती  सर्व्हे क्रमांक 413 मधील सदर वारसाची नोंद रद्द व्हावी असा निकाल दिलेला आहे. सदर निकालाची अंमलबजावणी होण्याची कार्यवाही सुरूही झालेली आहे. या सर्व गोष्टी यातील देवस्थानच्या जागेवर चुकून झालेली नोंद रद्द करणे संदर्भात मी आणि माझे बंधू यांनी वैयक्तिक तहसीलदार ऑफिस,प्रांत ऑफिस वेळोवेळी अर्ज केलेले होते. जर सदरची जमीन आम्हाला आमच्या ताब्यात ठेवायची असती तर 2010 पासून माननीय तहसीलदार यांच्याकडे सदरची नोंद रद्द होण्यासाठी अर्ज केलेच नसते. सदरची जमीन आजही देवस्थानचेच ताब्यात आहे, यापूर्वीही देवस्थानचे ताब्यात होती, भविष्यातही ती देवस्थानचीच राहणार आहे यामध्ये कोणतीही तीळ मात्र शंका नाही. मात्र या चुकून झालेल्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन समाजामध्ये काही विघ्नसंतोषी लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करून नाहक तुषार पाटील व त्यांच्या कुटुंबीयांची आणि श्री कालभैरव देवस्थान विश्वस्त मंडळ यांची बदनामी करत आहेत या संदर्भात सर्व नागरिकांनी या लोकांपासून सावध राहावे असे आव्हान तुषार साहेबराव पाटील यांनी केले आहे 

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला