गोंदवल्यातील रस्त्याला घसरगुंडीचे स्वरुप

चिखलमय अन खड्ड्याच्या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त

 दहिवडी :  गोंदवले येथे रस्त्याचे अर्धवट  कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. परंतु कामातील दिरंगाई , प्रशासनाचा गोंधळ यामुळे काम सतत रखडत चालले आहे. परिणामी याचा फटका मात्र नागरिकांना बसत आहे. गोंदवले ते दहिवडी रस्त्याची ही बिकट अवस्था गेल्या एक वर्षांपूर्वी या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती मात्र आता पुन्हा या रस्त्याची दुरावस्था झाली असून बांधकाम विभागाने या समस्येकडे पुन्हा लक्ष देऊन हे खड्डे तीव्रता मुजवण्याची मागणी वाहनचालक व परिसरातील नागरिक करीत आहेत. या रस्त्यावर वाहनांची संख्या दिवसान दिवस वाढत आहे. त्यातून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेल्या भागात दररोज वाहतूक कोंडी होत आहे.

 त्यामुळे जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो त्यातच पावसाचे पाणी साचल्याने पाण्यातून वाहन गेल्याने रस्त्यावरून पायी चालणाऱ्यांवर  ते पाणी उडते संबंधित विभागाने या समस्येकडे लक्ष देऊन रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती केला पाहिजे असे नागरिकांतून बोलले जात आहे.

      या रस्त्याला कोणी वाली आहे का नाही असे हे बोललं जात आहे. हा रस्ता तालुक्याच्या ठिकाणी जाणारा रस्ता असुन या रस्त्याने पूर्व भागातील संपूर्ण नागरिक प्रवास करतात तसेच शालेय विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ राहत असते. सतत पाऊस पडल्याने खड्डे पाण्याने भरल्याने खड्ड्यात पाणी की पाण्यात खड्डे हेच समजेना या खड्ड्यांमुळे नागरिकांचा आणि प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.

 

 

 गोंदवले बुद्रुक येथील मुख्य चौकातच पाण्याने भरलेल्या खड्ड्यांत साठलेल्या पाण्याने रस्त्याला घसरगुंडीचे स्वरूप.
    

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला