सुप्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प.अविनाश महाराज महाडिक (जावलीकर) यांचा लाडका ‘देवा’ बैलाला पालखी रथ ओढण्याचा मान
बापु वाघ
- Tue 18th Jun 2024 03:50 pm
- बातमी शेयर करा
जावली : संत ज्ञानेश्वर महाराज यांचे धाकटे बंधू संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचे सासवडमधून दि. ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सोपानदेव मंदिरातून प्रस्थान होणार आहे. या सोहळ्याच्या रथासाठी सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागामधील जावली तालुक्यातील घोटेघर गावचे सुपुत्र आणि सुप्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प.अविनाश महाराज महाडिक (जावलीकर) यांच्या ‘देवा’ बैलाला पालखी रथ ओढण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे महाडीक व त्यांच्या देवाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
संतश्रेष्ठ श्री सोपानदेव महाराज पालखी सोहळा श्री. क्षेत्र सासवड ते श्री. क्षेत्र पंढरपूर पालखी रथासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प.अविनाश महाराज महाडिक (जावलीकर) यांचा लाडका ‘देवा’ बैलाला पालखी रथ ओढण्याचा मान मिळाला. मेढा येथील बैल बाजारात २०२२ मधील सगळ्यात मोठी विक्रमी बोली करून ‘देवा’ या बैलाची महाडिक यांनी खरेदी केली होता. तोच बैल आज पालखीचा मानकरी ठरला आहे.
ह.भ.प. अविनाश महाराज हे बालपणापासूनच आध्यात्मिक क्षेत्रात आहेत. त्यांनी आळंदी येथे आध्यात्मिक शिक्षण घेतले आहे. गेल्या १५ वर्षापासून ते सातारा, महाबळेश्वर, जावळी, वाई आणि राज्यातील इतर जिल्ह्यातही कीर्तन सेवा करत आहेत. अविनाश महाराज हे ऐतिहासिक कीर्तनही करतात. महाडिक यांच्या ‘देवा’ या बैलाला हा मान मिळाल्यामुळे कुटुंबासह गावाची शान वाढली आहे.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 18th Jun 2024 03:50 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 18th Jun 2024 03:50 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 18th Jun 2024 03:50 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Tue 18th Jun 2024 03:50 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Tue 18th Jun 2024 03:50 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Tue 18th Jun 2024 03:50 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Tue 18th Jun 2024 03:50 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Tue 18th Jun 2024 03:50 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Tue 18th Jun 2024 03:50 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Tue 18th Jun 2024 03:50 pm













