शिवेंद्रसिंहराजेंनी समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले सौ. वेदांतिकाराजे
महानुभाव मठात दीपोत्सवानिमित्त दिली सदिच्छा भेटSatara News Team
- Sat 2nd Nov 2024 06:47 pm
- बातमी शेयर करा
सातारा- सातारा- जावली मतदारसंघात प्रत्येक गावात, वाडी- वस्तीत विकासाचा झंजावात करून शिवेंद्रसिंहराजेंनी संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट केला आहे. समाजातील सर्व घटकांचे विविध प्रश्न, समस्या सोडवून त्यांनी प्रत्येक घटकाला, प्रत्येक समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
सातारा येथील महानुभाव मठ येथे आयोजित दीपोत्सव कार्यक्रमाला सौ. वेदांतिकाराजे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी मठाधिपती हेमंतराज बिडकर उर्फ सातारकर बाबा, राजू बिडकर, महेंद्र बिडकर, तपस्विनी आशाताई बिडकर, रंजनाताई बिडकर, वेळापुरे, निलेश बिडकर, विकास देशमुख, महेंद्र गार्डे, अक्षय भोसले, शंकर भोसले, श्रेयश देशमुख यांच्यासह अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मठाधिपती बिडकर यांनी सौ. वेदांतिकाराजे यांचे यथोचित स्वागत केले. सौ. वेदांतिकाराजे यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या, शिवेंद्रसिंहराजेंनी महानुभाव पंथातील लोकांच्या विविध समस्या सातत्याने सोडवल्या आहेत. महानुभाव पंथच नव्हे तर, सर्वच समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे नेहमीच प्राधान्य देतात. मतदारसंघात विकासात्मक कामाबरोबरच समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सामाजिक सलोखा आणि एकोपा जपण्याचे काम शिवेंद्रसिंहराजे करत आले आहेत. आगामी काळातही शिवेंद्रसिंहराजे महानुभाव मठातील लोकांच्यासह सर्व समाजाच्या सर्वप्रकारच्या समस् या सोडवतील, याची खात्री सर्वांनाच आहे. त्यामुळेच मतदारसंघातील जनता आणि समाजातील सर्व घटक शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठीशी खंभीरपणे उभे आहेत. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजेंचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आपण सर्वांनी सोबत राहून शिवेंद्रसिंहराजेंना विक्रमी मताधिक्य द्यावे, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी केले.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 2nd Nov 2024 06:47 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 2nd Nov 2024 06:47 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 2nd Nov 2024 06:47 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 2nd Nov 2024 06:47 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 2nd Nov 2024 06:47 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 2nd Nov 2024 06:47 pm
संबंधित बातम्या
-
पदांसाठी मुलाखतींना चंद्रकांत जाधव यांचा कडाडून विरोध
- Sat 2nd Nov 2024 06:47 pm
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Sat 2nd Nov 2024 06:47 pm
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sat 2nd Nov 2024 06:47 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Sat 2nd Nov 2024 06:47 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Sat 2nd Nov 2024 06:47 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Sat 2nd Nov 2024 06:47 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Sat 2nd Nov 2024 06:47 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Sat 2nd Nov 2024 06:47 pm













