दुष्काळी माणमध्ये लम्पीबाबत युध्दपातळीवर लसीकरणास सुरुवात
एकनाथ वाघमोडे
- Tue 20th Sep 2022 11:42 am
- बातमी शेयर करा

माण : पशुधनाला होणाऱ्या लम्पी या संसर्गजन्य आजारामुळे ग्रामीण भागातील शेतकरी पशुपालकांमध्ये खूप चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावरती आज दुष्काळी तालुका समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यात लम्पीबाबत युध्दपातळीवर लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. आज दहिवडी शहरात लसीकरण करण्यात आले यावेळी माण खटावचे उपविभागीय अधिकारी शैलेश सूर्यवंशी, बांधकाम सभापती महेश जाधव, डॉ.आरिफ इनामदार, डॉ. स्मिता मलगुंडे, डॉ. प्राजक्ता भुजबळ, डॉ चंद्रकांत खाडे उपस्थित होते.यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी म्हणाले लम्पी हा विषानुजन्य त्वचारोग असल्यामुळे त्याचा प्रसार रोखणे गरजेचे आहे. तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी नागरिकांत लम्पी या आजाराबाबत माहिती देऊन तात्काळ लसीकरण पूर्ण करून घ्यावे शेतकरी व स्थानिक डॉक्टर यांची मदत घ्यावीडॉ.इनामदार यांनी बोलताना सांगितले की, लसीकरण केल्याने दुग्ध व्यवसायावर याचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही. आम्ही मोठ्या प्रमाणावर प्रभावी जनजागृत करत आहोत. तालुक्यात आम्ही लसीकरणाचा वेग वाढवला आहे. खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरांना देखील आम्ही मदतीसाठी घेतलं आहे. 25 शासकीय कर्मचारी यांच्या सह खाजगी डॉक्टर टीम कार्यरत करण्यात आली आहे. बांधकाम सभापती जाधव म्हणाले सर्वसामान्य शेतकरी वर्गाला या मोहिमेत सामील करून शेतकऱ्यांचे गोधन वाचविण्यासाठी आणि त्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाकडून गावागावात जनजागृती होणे देखील गरजेचे आहे. लसीकरण केल्याने दुग्ध व्यवसायावर याचा कोणताही परिणाम होत नाही याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे.
#MAAN
#ANIMALVACCINATION
#MAANGOV
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Tue 20th Sep 2022 11:42 am
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Tue 20th Sep 2022 11:42 am
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Tue 20th Sep 2022 11:42 am
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Tue 20th Sep 2022 11:42 am
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Tue 20th Sep 2022 11:42 am
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Tue 20th Sep 2022 11:42 am
संबंधित बातम्या
-
ऐतिहासिक निर्णयांनी उत्साहात पार पडली वडी गावातील विशेष ग्रामसभा
- Tue 20th Sep 2022 11:42 am
-
‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
- Tue 20th Sep 2022 11:42 am
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस....
- Tue 20th Sep 2022 11:42 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ८/७/२०२५ मंगळवार
- Tue 20th Sep 2022 11:42 am
-
कराड उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेवर संघर्ष समितीचे ताशेरे – सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
- Tue 20th Sep 2022 11:42 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Tue 20th Sep 2022 11:42 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Tue 20th Sep 2022 11:42 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Tue 20th Sep 2022 11:42 am