लासुर्णे येथील उबाळे कुटुंब गेल्या तीन वर्षापासून शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत
जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे मदतीची मागणीअज्जू मुल्ला
- Thu 30th Jun 2022 08:39 am
- बातमी शेयर करा
तीन वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे राहते घर पडल्यामुळे बेघर झाले शासनाच्या वतीने त्याचा पंचनामा करून देखील आज पर्यंत त्यांना कुठलीही मदत मिळाली नाही किंवा रमाई योजनेमार्फत मागणी करूनही अजूनही बेघर आहेत.
सातारा न्यूज- कोरेगाव : लासुर्णे तालुका कोरेगाव येथील समीर बाबुराव उबाळे यांचे तीन वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे राहते घर पडल्यामुळे बेघर झाले शासनाच्या वतीने त्याचा पंचनामा करून देखील आज पर्यंत त्यांना कुठलीही मदत मिळाली नाही किंवा रमाई योजनेमार्फत मागणी करूनही अजूनही बेघर आहेत. प्रशासनाने या कुटुंबाकडे तातडीने दखल देऊन मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र सरचिटणीस रमेश उबाळे यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

. सन 2019 मध्ये अतिवृष्टी मध्ये झालेल्या पावसामुळे लासुरने गावातील मागासवर्गीय वस्तीमध्ये राहणाऱ्या समीर बाबुराव उबाळे यांचे घराची भिंत मध्यरात्री पडल्यामुळे सदरहू कुटुंब बेघर झाले आहे. सुदैवाने त्यावेळी कुठलीही जीवित हानी झाली नाही. या पडलेल्या घराचा पंचनामा सदर संबंधित तलाठी व ग्रामसेवक यांनी केला होता तसेच पीडितांना घरकुल योजनेचा लाभ मिळण्याच्या अनुषंगाने तीन वर्षांपूर्वीच अर्ज सादर केला आहे. मात्र तात्कालीन गटविकास अधिकारी तलाठी ग्रामसेवक यांनी कुठलीही मदत केलेली नसून 2019 ते 2022 या दरम्यान शासकीय योजनेअंतर्गत 213 घरकुले मंजूर झाल्याचे निदर्शनात आले आहे. तथापि समीर उबाळे यांचे नाव 16 अनु क्रमांकावर असूनही त्यांना आज पर्यंत घरकुल मिळाले नाही त्यांना राहण्यासाठी घर नसल्याने स्वतः रमेश उबाळे यांनी त्यांना गेले तीन वर्षे गावातील राहण्यासाठी घर दिलेले आहे. अशी अवस्था उबाळे यांची असताना देखील आज पर्यंत यांना याबाबत मदत मिळाली नाही तरी जिल्हाधिकारी सातारा यांनी यामध्ये लक्ष घालून त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती रमेश उबाळे यांनी जिल्हाधिकारी सातारा यांचेकडे केलेली आहे
koregav
koregavDeathofayoungboywhenhelearnsswimming
mhaheshshinde
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 30th Jun 2022 08:39 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Thu 30th Jun 2022 08:39 am
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Thu 30th Jun 2022 08:39 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Thu 30th Jun 2022 08:39 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Thu 30th Jun 2022 08:39 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Thu 30th Jun 2022 08:39 am
संबंधित बातम्या
-
खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
- Thu 30th Jun 2022 08:39 am
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Thu 30th Jun 2022 08:39 am
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Thu 30th Jun 2022 08:39 am
-
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Thu 30th Jun 2022 08:39 am
-
पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...
- Thu 30th Jun 2022 08:39 am
-
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Thu 30th Jun 2022 08:39 am
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Thu 30th Jun 2022 08:39 am
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी मतेंवर गोरे अंकुश ठेवणार? कि पोलिस अधीक्षक दोषी ठरवणार?
- Thu 30th Jun 2022 08:39 am












