सातारच्या आर्याचा आंतरराष्ट्रीय ठोसा
Satara News Team
- Tue 20th Sep 2022 07:12 am
- बातमी शेयर करा

सातारा : भारताच्या महिला बॉक्सर मेरि कोम हिच्याप्रमाणे साताऱयातूनही कोणीतरी महिला बॉक्सर घडावे असे सातारकरांना वाटत असतानाच साताऱयातील आर्या बारटक्के हिने ती कमाल केली आहे. तिने सार्बिया येथे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सहभाग घेऊन सार्बियाच्या महिला बॉक्सरला ठोसा लगावून ब्रॉन्झ मेडल मिळवले. तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सातारा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी तिचे कौतुक केले आहे.साताऱयातील बांधकाम व्यावसायिक देवेंद्र बारटक्के आणि ज्योती बारटक्के यांची कन्या आर्या हिला खेळात जायचे होते. तिने आपली ही इच्छा आईवडिलांकडे आठवीत असताना व्यक्त केली आणि त्यांनी लगेच बॉक्सिंगसाठी निवड करुन तिला बॉक्सिंगचे प्रशिक्षक अमित सागवान यांच्याकडे सुरु केले. तिने शाळेच्या कार्यकाळात घौडदौड सुरुच ठेवली. परंतु महाविद्यालयीन काळातही तिने जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवर ठसा उमटवला. तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पोदार इंटरनॅशनल स्कूलला तर उच्च माध्यमिक शिक्षण शाहु ऍकॅडमीत घेतले असून सध्या स्व. यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकते आहे. तीने सीबी नॅशनल गोल्ड मिळवले असून तीन वेळा खेलो इंडियात स घेतला होतो. सध्या 13 ते 18 या कालावधीत सार्बियात बॉक्सिंगची स्पर्धा पार पडली. त्यामध्ये सार्बियाच्याच बॉक्सरला आर्याने हरवून ब्राँझ पदक पटकावले. त्याबद्दल तिचे अभिनंदन होत आहे.तिने देशासाठी काहीतरी करावेमाझ्या मुलीने हे जे यश मिळवले आहे. त्याबद्दल मला तिचा अभिमान आहे. तीने देशासाठी काहीतरी करावे असे मला वाटते. तिने आज मिळवलेले यश हे तिच्यासाठी आणखी पुढच्या यशाची पायरी आहे.देवेंद्र बारटक्केतिच्या आईवडिलांचा अभिमान आहेएक मुलगी असून तिला बॉक्सिंग या खेळात तिच्या आईवडिलांनी उतरवले ही खूप अभिमानाची बाब आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत मेडल मिळवणारी ती एकमेव साताराची मुलगी आहे. तिचीच प्रेरणा घेवून सातारा जिह्यातील इतर मुलीही या खेळात येतील. बॉक्सिंग या खेळामध्ये सातारा जिल्हा राज्यात आठव्या क्रमांकावर आहे.राजेंद्र चोरगे, जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Tue 20th Sep 2022 07:12 am
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Tue 20th Sep 2022 07:12 am
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Tue 20th Sep 2022 07:12 am
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Tue 20th Sep 2022 07:12 am
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Tue 20th Sep 2022 07:12 am
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Tue 20th Sep 2022 07:12 am
संबंधित बातम्या
-
ऐतिहासिक निर्णयांनी उत्साहात पार पडली वडी गावातील विशेष ग्रामसभा
- Tue 20th Sep 2022 07:12 am
-
‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
- Tue 20th Sep 2022 07:12 am
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस....
- Tue 20th Sep 2022 07:12 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ८/७/२०२५ मंगळवार
- Tue 20th Sep 2022 07:12 am
-
कराड उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेवर संघर्ष समितीचे ताशेरे – सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
- Tue 20th Sep 2022 07:12 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Tue 20th Sep 2022 07:12 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Tue 20th Sep 2022 07:12 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Tue 20th Sep 2022 07:12 am