शालेय परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करा : मनसेची मागणी

सातारा : सातारा शहरातील प्रचंड वरदळीचे व वाहतुकीचे राजपथ व कर्मवीर भाऊराव पाटील पथ या ठिकाणी शाळा सुटताना व भरताना होणाऱ्या वाहतूक कोंडीवर त्वरित उपाययोजना कराव्यात यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा शहर विभागा कडून शहराध्यक्ष राहुल पवार व पदाधिकारी यांनी निवेदन दिले निवेदनाच्या प्रति सातारा शहर ट्राफिक पोलीस निरीक्षक मा शेलार साहेब ,रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव मा साळुंखे साहेब व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा विनय गौडा साहेब यांना प्रत्यक्ष भेटुन देण्यात आले राजपथ व कर्मवीर पथ या ठिकाणी शहरातील मुख्य शाळा व महाविद्यालय आहेत

शाळा सुटताना व भरताना या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते व या वाहतूक कोंडीमुळे भविष्यात अपघात होऊन शांतता व संस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याबाबत वाहतूक शहर पोलिसांनी संबंधित ठिकाणी वाहतूक पोलीस नेमणे तसेच रयत शिक्षण संस्थेतील माननीय सचिव साळुंखे साहेब यांना विनंती करून याबाबत शाळा सुटताना व भरताना संस्थेकडून स्वयंसेवक ठेवून विद्यार्थ्यांना रस्ता पास करणे तसेच ट्रॅफिकला मदत करणे बाबत विनंती केली व जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी मा विनय गौडा साहेब यांना शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षणाधिकारी , माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची व विविध शाळा कॉलेज महाविद्यालय आणि शहर ट्राफिक अधिकारी यांची मीटिंग घेऊन याबाबत योग्य ते निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आली शाळा कॉलेज यांच्या भरणे व सुटणे यावेळेत 15 ते 20 मिनिटाचे अंतर ठेवावे याबाबत विनंती करण्यात आली सदर निवेद देते समय ट्राफिक अभ्यासक माननीय मधुकर शेंबडे सातारा शहर उपाध्यक्ष वैभव वेळापुरे भरत रावळ प्रशांत सोडमिसे विभाग अध्यक्ष गणेश पवार महिला शहर अध्यक्ष सौ वैशा लीताई शिरसागर शाखा अध्यक्ष अविनाश भोसले सागर पवार स्वप्निल जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला