गुन्हेगारांची कर्दनकाळ व धडाकेबाज लेडी सिंघम! शिरवळ पोलीस स्टेशनची कणखर पोलीस उपनिरीक्षक "वृषाली देसाई "!

शिरवळ पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांचा वाढदिवस दिनांक 9 सप्टेंबर { आज } रोजी साजरा होत आहे...

शिरवळ पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांचा वाढदिवस दिनांक 9 सप्टेंबर { आज } रोजी साजरा होत आहे..

 

अल्प परिचय... 

सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांचा देखील समावेश आहे त्यांची बदली सातारा ते पुणे ग्रामीण करण्यात आली आहे. मुळच्या वृषाली देसाई या कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत, चंदगड तालुक्याच्या मातीत आई सौ. प्रगती देसाई व वडील श्री. अशोक देसाई या दांपत्याच्या पोटी वृषाली देसाई यांचा जन्म सदन कुटुंबात झाला.आई गृहिणी तर वडील बीएसएनएल भारत संचार निगम लिमिटेड येथे शासकीय नोकरीत होते.. 

लहानपणापासून ठेवली होती जिद्द.. 

वृषाली देसाई या लहानपणापासून लढवय्या व जिद्दी होत्या आपण चांगले शिक्षण घेऊन शासकीय सेवेत जाण्याची जिद्द ठेवली होती. तसे लहानपणापासून त्यांच्यावर तसे संस्कार झाले होते खास करून वृषाली यांना खाकी सेवेची आवड होती घरात कोणीतरी पोलीस अधिकारी झाले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती व बालपणापासून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण क्षेत्रात हुशार असलेल्या वृषाली देसाई यांनी चंदगड येथे आपले संपूर्ण शिक्षण पूर्ण केले.शिक्षण पुर्ण होताच वेद लागले होते खाकी वर्दीचे यासाठी जिद्द मेहनत व तितकाच अभ्यास ठेवत आपल्या पहिल्याच प्रयत्नात सन 2014 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्या ट्रेनिंग साठी पहिल्यांदाच घर सोडून नाशिक येथे गेल्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून  गेल्या...

 संवेदनशील मनाची पोलीस अधिकारी.. 

सातारा जिल्ह्यात पहिल्यांदा नियुक्ती होताच आपले कर्तव्य पुर्ण क्षमतेने बजावले. सुरवातीला फलटण ग्रामीण, सातारा तालुका,शिरवळ या पोलीस स्टेशन येथे कर्तव्य बजावताना वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले.यात काही शंका नाही. देसाई या स्वभावाने मृदू,मितभाषीक आहेत. ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या समजावून घेणे त्यांच्या अडचणी सोडवणे,विशेष करून महिलांचे, विविध प्रश्न हाताळण्याचे कसब त्यांच्या अंगी आहे.आणि यासाठी त्यांची वेगळी ओळख आहे.. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक गुन्हे उघड करून आरोपीला जेलची हवा दाखविली होती याच काळात वृषाली देसाई या कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून उदयास येऊ लागल्या, एखाद्या तपासात कोणाच्याही दबावाला बळी न पडता तपास करणे हा महत्त्वाचा गुण वृषाली देसाई यांच्यात आहे... 

कोरोनाच्या कठीण काळात कौतुकास्पद कामगिरी... 

कोरोनाच्या कठीण काळात वृषाली देसाई यांनी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शिरवळ येथील चेक पोस्टवर आपले कर्तव्य बजावले आपल्या बाळाला दूर ठेवुन अहोरात्र आपले कर्तव्य व जवाबदारी यशस्वीपणे पेलले होते. मायेपेक्षा कर्तव्य मोठे म्हणून काळजावर दगड ठेऊन या मायेने कोरोनाच्या लढाईत आपले कर्तव्य बजावले आहे.. पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई आधी खाकी मग बाकी या उक्तीला अनुसरुन खाकी वर्दीतील स्त्री शक्ती असे आपले कर्तव्य बजावताना दिसल्या ‌..


पती श्री.सुधीर मुरकुटे व कुटुंबातील सगळ्यांची साथ... 

वृषाली यांना कुटुंबियांची चांगली साथ मिळाली आहे. महिलांनी कुणाचा आधार घेवून जगण्यापेक्षा स्वावलंबी व्हावे नोकरी विवाह संसार करत जबाबदारी वाढली. मात्र त्यांनी पोलिस खात्यातील आपल्‍या कामावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. कुटुंबाची जबाबदारी मात्र नोकरीला असलेल्या सुधीर यांनी पेलली.त्यामुळे  त्यांची यशस्वी वाटचाल पुढे सुरू राहण्यास मदत झाली. आजही त्या कुटुंब सांभाळतानाच आपल्या कामात तेवढ्याच तत्‍परतेने झोकून देतात. अनेकदा घरातील सणांना त्यांना मुकावे लागते. मुलांनाही वेळ देण्यास मिळत नसल्याची खंत त्यांना आहे. मात्र पोलिसांची ड्यूटी 24 तास असल्याने त्याला पर्याय नसल्याचे गृहित धरूनच त्या आजपर्यंत काम करत आहेत... 

वृषाली देसाई यांच्याकडून सर्वांना मिळतो समान न्याय..

कर्तव्यदक्ष व डॅशिंग महिला पोलीस अधिकारी व  कायद्यानुसार काम करीत असल्याने त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत.पोलीस स्टेशनला आलेल्या तक्रारदार महिला असो किंवा पुरुष व त्यांच्याशी सन्मानाने वागणूक देणे त्यांची व्यथा जाणून घेणे त्यांची सत्य परिस्थिती ऐकल्यानंतर त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांच्या बाजूने कोणाची ही भीडभाड न करता कोणाच्याही दबावाखाली काम न करता आपले काम कायद्या नुसार करीत असतात यामुळेच वृषाली यांनी कार्यतत्पर अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांशी स्नेहपूर्ण संबंध राहीले आहेत.पोलिस खात्यात सेवा बजवाताना अनेक विभागात रात्रंदिवस काम करण्याची वेळ आली. मात्र, त्यांनी प्रामाणिकपणे व कोणताही डाग खाकी वर्दीला लागू दिला नाही... 


वृषाली देसाई यांची भावना ....

 पोलीस दलात आल्यावर आपल्याला चांगले वातावरण उपलब्ध होईल का, महिला म्हणून समस्या येतील का अशा शंका त्यांच्या मनात होत्या परंतु महिलांसाठी पोलिस दलात खूप चांगले वातावरण आहे. येथे काम करताना सरकारी कर्तव्य बजावताना समाजसेवाही करता येते. एखाद्यावर झालेला अन्याय दूर करता येतो. प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी पोलिस दल एक चांगली संधी आहे.. 

 

अशा या खाकीतल्या अधिकार्यांला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला