मेढा नियोजित घनकचरा प्रकल्पास सोनगाव ग्रामस्थांचा विरोध
Satara News Team
- Tue 10th Sep 2024 06:43 pm
- बातमी शेयर करा
जावली : जावली तालुक्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या मेढा नगरपंचायतीने सोनगाव येथील जागेत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नियोजित केलेला आहे. हा घनकचरा प्रकल्प होवू नये. यासाठी सोनगाव ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. तशा आशयाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे. त्याच निवेदनाला ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून मेढा नगरपंचायतीला दिलेल्या सुचनांचे पत्र सादर केलेले आहे.
आज मंगळवारी दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन सोनगाव ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी सोनगाव ग्रामस्थ जयदीप शिंदे, जगन्नाथ पिसाळ, मधूकर शिंदे, जितेंद्र शिंदे, लक्ष्मण चिकणे, जितेंद्र चिकणे, विश्वनाथ शिंदे, अविनाश तिवाटणे, युवराज शिंदे, नारायण शिंदे, संपत चिकणे, नथूराम चिकणे, सत्यवान शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जयदीप शिंदे म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी चार महिन्यापूर्वी सोनगाव ग्रामस्थाबाबत बाबत एक अन्यायकारक आदेश काढला आहे. मेढा नगरपंचायतीचा कचरा सोनगावच्या गायरान क्षेत्रात टाकण्याचा घाट घातला आहे. या निर्णयाचा तीव्र निषेध करत आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी २०२१ साली सुद्धा ग्रामसभेचा ठराव पुर्णपणे विरोधी असून सुद्धा गायरान या क्षेत्रात पुर्वी वीज वितरण कंपनीला जागा दिलेली आहे त्यातली अर्धी जागा शिल्लक असताना ती जागा आमच्या गावातील पाळीव जनावरांना गवत चरण्यासाठी होती. २००आंब्याची झाडे आहेत. त्याचा विचार न करता मेढा नगरपंचायतीचा नियोजित घनकचरा प्रकल्प सोनगावच्या गायरान जमिनीत करण्यात येणार आहे. तो आदेश रद्द करावा. त्याऐवजी मेढा नगरपंचायतीच्या हद्दीत शासकीय जागा उपलब्ध आहेत. मेढयापासून सोनगाव हे तेरा किलोमीटरवर आहे. त्याचा कचरा येथे आणायचा आणि विल्हेवाट लावायची ही योग्य बाब नाही.
प्रतापगड कारखाना कामगार वसाहत आहे. कारखान्याचे ऑफिस, शाळा, वाढीव गाव आहे. लोकवस्तीत हा कचरा प्रकल्पाचा घाट कशासाठी? हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सदर निवेदनाची तपासणी करून योग्य ते निर्णय घेतला जाईल असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 10th Sep 2024 06:43 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 10th Sep 2024 06:43 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 10th Sep 2024 06:43 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Tue 10th Sep 2024 06:43 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Tue 10th Sep 2024 06:43 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Tue 10th Sep 2024 06:43 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Tue 10th Sep 2024 06:43 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Tue 10th Sep 2024 06:43 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Tue 10th Sep 2024 06:43 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Tue 10th Sep 2024 06:43 pm













