सातारा जिल्हा पोलीस दल आयोजित, ७ वी - गड भ्रमंती व स्वच्छता मोहिम - किल्ले भूषणगड
मंगेश कुंभार- Sun 4th Jun 2023 02:46 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्हा पोलीस दलाकडून 'आपले किल्ले आपली जबाबदारी' हि मोहीम हाती घेत गाद किल्ल्यांची स्वछता करण्याचा एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
याच "आपले किल्ले आपली जबाबदारी” अनुषंगाने सातारा पोलीस दलामार्फत आज किल्ले भूषणगड, ता. खटाव या ठिकाणी गड भ्रमंती व स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये दहिवडी उपविभागातील उपविभागीय कार्यालय तसेच दहिवडी, म्हसवड, औंध, वडूज या पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. तसेच सातारा पोलीस दलातर्फे सदर मोहिमेबाबतची लिंक प्रसारित करण्यात आल्यामुळे सातारा जिल्हयातील नागरीक देखील मोहिमेमध्ये सहभागी झालेले होते. सदर मोहिमेदरम्यान किल्ले भूषणगड पायथा येथे एकत्रीत येवून चढाई ( ट्रेक) करण्यात आली तसेच समुह तयार करुन किल्ले भूषणगड येथे नियोजनबध्द स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिमेदरम्यान गड पायथा परिसर, तलाव परिसर, महादरवाजा परिसर तसेच हरणाई मंदिर परिसरात स्वच्छता करुन जैविक व अजैविक असा अंदाजे १२५ किलो कचरा गोळा करण्यात आला. गडावर हरणाई मंदिराच्या सभा मंडपात सर्वांना एकत्रित करुन शिवप्रेमी श्री. मानसिंग कदम, कवठे महाकाळ, सांगली यांनी भूषणगडाबद्दल माहिती दिली.

सदर मोहिमेमध्ये श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा, श्री. कमलेश मिना, परिविक्षाधिन पोलीस अधीक्षक, श्रीमती अश्विनी शेंडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग कॅम्प वडूज, श्री. अजय कोकाटे, परिविक्षाधिन पोलीस अधीक्षक, श्री.डी.पी. दराडे, स. पो. नि. औंध पो. ठाणे, श्री. आर. पी. भुजबळ, स.पो.नि. म्हसवड पो.ठाणे, श्री. अक्षय सोनावणे, स. पो. नि. दहिवडी पो.ठाणे, पोलीस उपनिरीक्षक श्री. जी. बी. केंद्रे, औंध पोलीस ठाणे वगैरे असे १५ पोलीस अधिकारी, ४० पोलीस अंमलदार व १५० नागरीक, सामाजिक कार्यकर्ते व विदयार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता.

दिनांक १५/०१/२०२३ रोजी पासून सातारा पोलीस दलामार्फत आयोजित आपले किल्ले आपली जबाबदारी मोहिमेअंतर्गत १) अजिंक्यतारा (दि.१५/०१/२०२३), २) वसंतगड (दि. २२/०१/२०२३), ३)जरंडेश्वर (दि.२९/०१/२०२३), ४) वैराटगड (दि.०५/०२/२०२३), ५) संतोषगड (दि.०५/०३/२०२३), ६) दातेगड (सुंदरगड) (दि. १६/०४/२०२३), ७) भूषणगड (दि. ०४/०६/२०२३) या ठिकाणी गड मोहिम व स्वच्छता मोहिम राबविण्यात आल्या असून मोहिमेत आज अखेर १०२ पोलीस अधिकारी, ५६३ पोलीस अंमलदार, १८४० नागरीक व विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवून एकुण अंदाजे ८२९ किलो कचरा गोळा करुन योग्य विल्हेवाट लावण्यात आली आहे. सातारा पोलीस दलामार्फत प्रत्येक रविवारी सातारा जिल्हयातील एक किल्ला निवडून सदरची मोहिम राबविण्यात येणार असून या मोहिमेमध्ये नागरिक, व्यापारी व तरुणांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आव्हानही सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे नवीन पिढीमध्ये इतिहासाबद्दल जनजागृती होण्यास देखील मदत होणार आहे.
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sun 4th Jun 2023 02:46 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sun 4th Jun 2023 02:46 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sun 4th Jun 2023 02:46 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sun 4th Jun 2023 02:46 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sun 4th Jun 2023 02:46 pm
संबंधित बातम्या
-
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sun 4th Jun 2023 02:46 pm
-
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sun 4th Jun 2023 02:46 pm
-
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sun 4th Jun 2023 02:46 pm
-
औंध पोलीस स्टेशनकडून त्वरीत कारवाई: ट्रक चालकाची जबरदस्तीने लूट करणाऱ्या प्रकरणात गुन्हा दाखल
- Sun 4th Jun 2023 02:46 pm
-
कसं काय पाटील.. आनेवाडीत त्यादिवशी घडलेले खरं आहे का?
- Sun 4th Jun 2023 02:46 pm
-
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sun 4th Jun 2023 02:46 pm
-
पदभार स्वीकारताच वेण्णा लेकवर उतरले PI हर्षद गालिंदे; वाहतूक कोंडीवर तात्काळ कारवाई
- Sun 4th Jun 2023 02:46 pm









