सातारा नगरपालिकेत अनेक इच्छुक हौश्या नवश्यांची गोची
प्रकाश शिंदे - Fri 29th Jul 2022 01:15 pm
- बातमी शेयर करा
सातारा - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार सातारा पालिका निवडणुकीसाठी इतर मागास प्रवर्गासाठी १३ जागा आरक्षित करण्यात आल्या. या जागा आरक्षित झाल्याचा फटका साताऱ्यातील दिग्गजांना बसल्याचे दिसते.
इतर मागास प्रवर्गासाठीची आरक्षण सोडत आज साताऱ्यातील शाहू कलामंदिरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी मुख्याधिकारी अभिजित बापट, सहायक मुख्याधिकारी पराग कोडगुले व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सुरुवातीस श्री. बापट यांनी सोडतीची माहिती देत प्रभाग रचनेनुसार इतर मागास प्रवर्ग महिलेसाठी ‘अ’ गट, तर ‘ब’ गट इतर मागास प्रवर्गाच्या सर्वसाधारण गटासाठी राहणार असल्याचे सांगितले.
यापूर्वी अनुसूचित जाती, जमातीसाठीचे आरक्षण जाहीर झाले असल्याने १, २, ३, ४, ८, १३, १५ हे सात प्रभाग सोडून १८ प्रभाग इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणासाठी निवडण्यात आले. यासाठीच्या चिठ्ठ्या सोडतीसाठी ड्रममध्ये टाकण्यात आल्या. त्यापैकी १३ चिठ्ठ्या शालेय विद्यार्थ्यांनी काढल्या. त्यामध्ये प्रभाग क्रमांक २१, २४, ६, १८, १०,१६, २५, १२, १९, ११, ५, २२, २० यांचा समावेश होता. या १३ प्रभागांच्या चिठ्ठ्यांपैकी ७ चिठ्ठ्यांच्या आधारे इतर मागास प्रवर्गातील महिलेच्या जागेसाठी आरक्षण सोडत झाली. या चिठ्ठ्यांच्या आधारे १०, ५, २२, १८, १६, ११, २१ या प्रभागातील ‘अ’ गट इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्याचे जाहीर झाले. त्यानंतर इतर मागास प्रवर्गातील सर्वसाधारण गटासाठी १२, २५, १९, २४, २०, ६ या प्रभागातील ‘ब’ जागा आरक्षित झाल्या. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास प्रवर्गासाठीची आरक्षण निश्चिती पूर्ण झाल्यानंतर ७, २३, ९, १७, १४ हे प्रभाग पूर्णपणे खुले राहिल्याचे समोर आले.
satarangarpalika
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 29th Jul 2022 01:15 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 29th Jul 2022 01:15 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 29th Jul 2022 01:15 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 29th Jul 2022 01:15 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 29th Jul 2022 01:15 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 29th Jul 2022 01:15 pm
संबंधित बातम्या
-
पदांसाठी मुलाखतींना चंद्रकांत जाधव यांचा कडाडून विरोध
- Fri 29th Jul 2022 01:15 pm
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Fri 29th Jul 2022 01:15 pm
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 29th Jul 2022 01:15 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Fri 29th Jul 2022 01:15 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Fri 29th Jul 2022 01:15 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Fri 29th Jul 2022 01:15 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Fri 29th Jul 2022 01:15 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Fri 29th Jul 2022 01:15 pm













