बेपत्ता झालेल्या महिलेचा माहेरी विहिरीत आढळला मृतदेह
Satara News Team
- Sat 5th Aug 2023 12:28 pm
- बातमी शेयर करा

पाटण: कराड तालुक्यातील आगाशिवनगर येथून गुरुवारी एक वृद्ध महिला बेपत्ता झाली होती. त्या महिलेचा कुटुंबियांकडून शोधही घेतला जात होता. कुटुंबीयांनी याबाबत पोलीस ठाण्यातही फिर्याद दिली होती. मात्र, बेपत्ता झालेल्या वृद्ध महिलेचा अखेर माहेरी गलमेवाडी-कुंभारगाव, ता. पाटण येथील एक सार्वजनिक विहिरीत मृतदेह आढळून आला.
चंद्रकला शंकर माटेकर (वय 65, सध्या रा. आगाशिवनगर) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील चिचांबा- माटेकरवाडी – कुंभारगाव या ठिकाणी राहत असलेलया शंकर पाटेकर यांनी आगाशिवनगर या ठिकाणी घर घेतले. त्या याठिकाणी ते स्थायिक झाले. दरम्यान गुरुवारची त्यांच्या पत्नी चंद्रकला माटेकर या घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेल्या. त्या घरात नसल्याचे पाहून त्यांच्या कुटुंबीय व नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांचा कुठेच पत्ता लागला नसल्याने अखेर त्यांच्या नातेवाईंकांनी कराड शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली.नातेवाईकांच्या फिर्यादीनंतर पोलिसांकडूनही वृद्ध महिलेचा शोध घेतला जात असताना गुरूवारी सायंकाळी चंद्रकला माटेकर या त्यांचे माहेर असलेल्या गलमेवाडी या गावात त्यांना गावातीलच काही लोकांनी पाहिले होते.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी तेथील सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहिरीजवळ त्यांच्याकडे असलेली पिशवी व चप्पल आढळून आल्याने ग्रामस्थांचा संशय आला. याबाबत खात्री केल्यावर त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला.गावातील काही ग्रामस्थांनी याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी हे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित वृद्ध महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. तसेच कराड येथील रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. सायंकाळी उत्तरीय तपासणी केल्यानंतर संबंधित वृद्धेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.
स्थानिक बातम्या
मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार
- Sat 5th Aug 2023 12:28 pm
नागठाणेजवळ टेम्पोच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू
- Sat 5th Aug 2023 12:28 pm
75 हजाराची लाच घेताना कोडोलीचा मंडलाधिकारी जाळ्यात
- Sat 5th Aug 2023 12:28 pm
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत पुसेसावळीत उद्या कॅम्पचे आयोजन
- Sat 5th Aug 2023 12:28 pm
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Sat 5th Aug 2023 12:28 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 5th Aug 2023 12:28 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 5th Aug 2023 12:28 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sat 5th Aug 2023 12:28 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sat 5th Aug 2023 12:28 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sat 5th Aug 2023 12:28 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sat 5th Aug 2023 12:28 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sat 5th Aug 2023 12:28 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sat 5th Aug 2023 12:28 pm