गुरुवार बाग तख्तवाडा येथे छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक करण्यास पालिकेची मंजुरी शाहुनगरी फौंडेशनच्या श्री.छ.वृषालीराजे भोसले यांची माहिती
शाहुनगरी फौंडेशनच्या श्री.छ.वृषालीराजे भोसले यांची माहिती
प्रकाश शिंदे- Mon 1st Aug 2022 09:11 am
- बातमी शेयर करा
सातारा, . – श्री.छ. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रुंपातर करणा-या छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक गुरुवार बाग येथे व्हावे यासाठी शाहुनगरी फौंडेशनच्यावतीने पालिकेकडे निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती त्यास पालिकेने मंजुरी दिली असून पुढील मंजुरीसाठी जिल्हास्तरीय समितीकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती शाहुनगरी फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा श्री.छ. वृषालीराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
पत्रकात, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री. छ. शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारे छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा किल्ले अंजिक्यतारा येथे दि. 12 जानेवारी 1708 रोजी राज्याभिषेक झाला. त्यानंतर अखंड हिंदुस्थानावर आपली सत्ता त्यांनी प्रस्थापित केली. कारभार करण्यास किल्ल्यावरील जागा अपुरी पडू लागल्यानंतर त्यांनी 1720 ते 1721 रोजी राजधानी शहर वसवून तख्तवाडा, रंगमहाल, अदालतवाडा आदी वास्तू बांधल्या. त्यानंतर त्यांचे वास्तव्य याचठिकाणी असत. अखंड हिंदुस्थानात ज्या वाडयातून हुकुम निघत ती वास्तू म्हणजे तख्तवाडा म्हणजेच सध्याची गुरुवार बाग. याच वास्तूमधून पुढे अनेक वर्षे छत्रपतींनी कारभार पाहिला. अशा परमपवित्र आणि स्फूर्तीदायक जागेमध्ये सातारा शहर संस्थापक छत्रपती शाहू महाराजांचे यथोचित स्मारक व्हावे. ज्याठिकाणी छत्रपतींचा राजदरबार भरत असे त्याचठिकाणी छत्रपती शाहू महाराजांचे अश्वारुढ स्मारक/मूर्ती स्थापित व्हावी. जगाला प्रेरणा देणारे स्मारक व्हावे, अशी मागणी शाहुनगरी फौंडेशनच्यावतीने नगरपालिकेकडे निवेदन देऊन करण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन पालिकेने त्यास मंजुरी दिली असून शासनाच्या स्मारक उभारण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वानुसार पुढील मान्यतेसाठी जिल्हास्तरीय समितीकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. याबाबत मुख्याधिकारी अभिजीत बापट आणि नगरपालिका प्रशासन यांचे शाहूनगरी फाऊंडेशनचे वतीने आभार मानण्यात आले...
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Mon 1st Aug 2022 09:11 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Mon 1st Aug 2022 09:11 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 1st Aug 2022 09:11 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 1st Aug 2022 09:11 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 1st Aug 2022 09:11 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 1st Aug 2022 09:11 am
संबंधित बातम्या
-
पदांसाठी मुलाखतींना चंद्रकांत जाधव यांचा कडाडून विरोध
- Mon 1st Aug 2022 09:11 am
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Mon 1st Aug 2022 09:11 am
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 1st Aug 2022 09:11 am
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Mon 1st Aug 2022 09:11 am
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Mon 1st Aug 2022 09:11 am
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Mon 1st Aug 2022 09:11 am
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Mon 1st Aug 2022 09:11 am
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Mon 1st Aug 2022 09:11 am













