औंध ता.खटाव येथील शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
रंगरंगोटी स्वच्छतेची कामे सुरू
अशपाक बागवान- Sun 25th Sep 2022 09:30 am
- बातमी शेयर करा
औंध : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या ग्रामनिवासिनी व मूळपीठ निवासिनी श्रीयमाईदेवी व राजवाडयातील कराडदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास सोमवार दि.२६ पासून प्रारंभ होत आहे. २६ सप्टेंबर ते गुरूवार दि.६ आँक्टोंबर अखेर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत अशी माहिती श्री यमाईदेवी देवस्थानच्या मुख्य विश्वस्त श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिली. सोमवारी सकाळी श्री कराडदेवीची यमाईदेवी मंदिरात मकरात स्थापना केली जाणार आहे. यावेळी पुण्यहवाचन, महाआरती,मंत्रपुष्पांजली आदी कार्यक्रम श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी व राजघराण्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहेत.मंत्र व पौरोहित्य पठन गणेशशास्त्री इंगळे व वसंतराव देशपांडे करणार आहेत. त्यानंतर सोमवार दि.२६ ते रविवार दि. २ आँक्टोंबर या दरम्यान नियमित सकाळी व संध्याकाळी महानैवेद्य, महाआरती, मंत्रपुष्पांजली तसेच रात्री ९ वाजता नियमित ह.भ.प. गजाननबुवा कुरोलीकर यांचे कीर्तन होणार आहे. तसेच मंगळवारी देवीच्या पाटयापूजन, देवीची ओटीपूजन,मूळपीठ देवीच्या ओटी भरणाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर सोमवार दि.३ रोजी मूळपीठ डोंगरावर देवीच्या अष्टमी उत्सवानिमित्त हरिजागराचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी देवीची पालखीतून मिरवणूक काढली जाणार आहे. यावेळी पूजा आरती, महानैवेद्य, महाआरती, मंत्रपुष्पांजली कुष्मांडपूजा, प्रसाद वाटप आदी कार्यक्रम होणार आहेत. मंगळवार दि.४ रोजी देवीउत्थापना, घट उत्थापना,कुमार कुमारी पूजन कार्यक्रम होणार आहे. बुधवार दि.५ रोजी राजवाडयात शस्त्रपूजा, सायंकाळी श्रींची पालखीतून सिमोल्लंघन मिरवणूक काढली जाणार आहे. यावेळी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर वेशीवर आपटा पूजन करून डबे लावून गोळीबार केला जाणार आहे. रात्री कराडदेवीच्या दरबार हाँल मध्ये सोने देण्याचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी गवई गाणे, अत्तर, गुलाब पाणी,पानसुपारी देण्याचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.गुरुवार दि.६ रोजी लळीताने नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे. दोन वर्षानंतर नवरात्रोत्सव होत असल्याने सर्वत्र स्वच्छता, रंगरंगोटी, मूळपीठ डोंगर, ग्रामनिवासिनी श्री यमाईदेवी देवी मंदिरात विद्युत रोषणाईचे काम सुरू आहे
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sun 25th Sep 2022 09:30 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sun 25th Sep 2022 09:30 am
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Sun 25th Sep 2022 09:30 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sun 25th Sep 2022 09:30 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sun 25th Sep 2022 09:30 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sun 25th Sep 2022 09:30 am
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Sun 25th Sep 2022 09:30 am
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Sun 25th Sep 2022 09:30 am
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Sun 25th Sep 2022 09:30 am
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sun 25th Sep 2022 09:30 am
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Sun 25th Sep 2022 09:30 am
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Sun 25th Sep 2022 09:30 am
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Sun 25th Sep 2022 09:30 am
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Sun 25th Sep 2022 09:30 am











