तिहेरी अपघातात युवकाचा मृत्यू एक जखमी; आरळे येथील घटना
Satara News Team
- Mon 22nd Aug 2022 03:26 pm
- बातमी शेयर करा
केतन यशवंत लेंभे हा अभियांत्रिकी विद्यालयातून पदवी पूर्ण करुन पुणे येथील एका खासगी कंपनीत कामाला होता. गावी आल्यानंतर ही घटना घडली एकुलता एक असणाऱ्या केतनच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
सातारा /दोन दुचाकी व एक चारचाकी अल्टो कार याचा तिहेरी अपघात होवून युवकाचा मृत्यू झाला. केतन यशवंत लेंभे, पिंपोडे बुद्रुक ता. कोरेगाव असे त्याचे नाव आहे. ही घटना शनिवार,दि. २0 रोजी सायंकाळी ६ वा. आरळे ता. सातारा गावच्या हद्दीत घडलीे. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.
याबाबत घटनास्थळावरुन व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिंपोडे बुद्रुक ता. कोरेगाव येथील केतन यशवंत लेंभे वय २५ आणि जय उत्तम भोईटे वय २२ आदर्की बुद्रुक ता. फलटण हे दोघेही शनिवारी सकाळी आपल्या व्यक्तीगत कामानिमित्त सातारा येथे आले होते. त्यानंतर ते पिंपोडे बुद्रुक येथील गावी दुचाकी क्र. एमएच ११ सीझेड ५५८१ वरुन जात होते. दरम्यान, आरळे येथील अभिषेक नर्सरीनजिक येताच फलटण येथून सातारा शहराकडे येणाऱ्या चार चाकी अल्टो कारने वेगात येत दुचाकीला कट मारला असे दुचाकीवरील जय भोईटे यांनी सांगितले. ही चारचाकी क्षणात निघून गेल्याने नंबर समजला नाही, याचवेळी दुचाकीवरील वेग नियंत्रण करताना रस्त्यावरील खड्डे चुकवताना समोर जाणाऱ्या दुचाकीवर ही गाडी धडकली. यामध्ये दोघेही जण गंभीररित्या जखमी झाले. यानंतर तत्काळ सिव्हील हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचारानंतर खासगी रुग्णालयात दोघांनाही दाखल करण्यात आले. त्यानंतर रविवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या दरम्यान केतन यशवंत लेंभे याचे निधन झाले. तर जय भोईटे याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती सुधारत आहे.
केतन यशवंत लेंभे हा अभियांत्रिकी विद्यालयातून पदवी पूर्ण करुन पुणे येथील एका खासगी कंपनीत कामाला होता. गावी आल्यानंतर ही घटना घडली. केतनच्या पश्चात आई, बहीण असा परिवार आहे. केतन याचे वडील यशवंत यांचे वीस वर्षापूर्वी निधन झाले होते. एकुलता एक असणाऱ्या केतनच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतचा अधिक तपास पो.उप. निरीक्षक जाधव या करत आहेत.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Mon 22nd Aug 2022 03:26 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Mon 22nd Aug 2022 03:26 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Mon 22nd Aug 2022 03:26 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Mon 22nd Aug 2022 03:26 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Mon 22nd Aug 2022 03:26 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Mon 22nd Aug 2022 03:26 pm
संबंधित बातम्या
-
पुसेगाव पोलीसांनी रेस्क्यु टीमच्या मदतीने नेर तलावत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधून बाहेर काढला
- Mon 22nd Aug 2022 03:26 pm
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Mon 22nd Aug 2022 03:26 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Mon 22nd Aug 2022 03:26 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Mon 22nd Aug 2022 03:26 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Mon 22nd Aug 2022 03:26 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Mon 22nd Aug 2022 03:26 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Mon 22nd Aug 2022 03:26 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Mon 22nd Aug 2022 03:26 pm













