शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक सचिव कै.साहेबराव पाटील यांचा स्मृतिदिन विविध उपक्रमाने संपन्न
Satara News Team
- Fri 16th Sep 2022 10:22 am
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा शहराच्या जवळ करंजे पेठेत कै.साहेबराव पाटील यांनी आपल्या सवंगड्यांना बरोबर घेत सन १९६९ साली शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना केली आणि आज तिचे ४ शाखेमध्ये विस्तार झालेला आपणाला पहायला मिळतो.. त्यामधील एक विद्यालय म्हणजे श्रीपतराव पाटील हायस्कूल जे आज संस्थेचे विद्यमान कल्पक सचिव तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच क्षेत्रात अविस्मरणीय अशी प्रगती करत आहे.. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक ०६/०९/२०२२ रोजी संस्थेने विकसित केलेल्या फोडजीई मंदिरा जवळच्या मैदानावर संस्थांतर्गत आर्चरी स्पर्धा संपन्न झाल्या तर बुधवार दिनांक ०७/०९/२०२२ रोजी ५ वी ते १२ वी पर्यंतच्या तिन्ही गटाच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संस्थेच्या श्रीपतराव पाटील हायस्कूल मध्ये तर १ते ४ गटाच्या वक्तृत्व स्पर्धा संस्थेच्या आदर्श विद्यामंदिर करंजे येथे तर माणिक कासट बालकमंदिर येथे बड़बड़ गीतांच्या स्पर्धा संपन्न झाल्या. श्रीपतराव मध्ये झालेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून म्हणजेच मान, फलटण,कराड,जावली कोरेगाव आणि सातारा तालुक्यातून शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता आणि सातारा,जावली, आणि कोरेगाव तालुक्यातील परीक्षकांनी सहकार्य करून ही स्पर्धा संपन्न केली होती तर गुरुवार दिनांक ०८/०९/२०२२ रोजी आंतर शालेय चित्रकला स्पर्धा संपन्न झाल्या होत्या तर शनिवार दिनांक १०/०९/२०२२ रोजी स्वर्गीय साहेबराव पाटील यांच्या पुण्यस्मरण दिनी शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने आदर्श विद्यामंदिर आणि न्यू मीडियम स्कूलच्या छोट्या बालचमूसाठी खेळाच्या साहित्यामुळे सुशोभित झालेल्या मैदानाचीही प्रमुख पाहूणे आणि संस्थाप्रमुखांच्या हस्ते यथोचित पूजा करण्यात आली आणि तदनंतर प्रमिला मंगल कार्यालय करंजे पेठ सातारा येथे प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी चेअरमन विठ्ठलजी माने यांचे अभ्यासपूर्ण विषय विवेचन झाले होते.जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मुंबई जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश श्रीकांत भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला होता तर क्रीडा व चित्रकला स्पर्धेचा बक्षीस समारंभ पावसामुळे पुढे ढकलला असून तो थोड्याच दिवसात संपन्न होणार असल्याचे माहिती शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव तुषार पाटील यांनी दिली आहे...
कै.साहेबराव पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सर्व उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सारंग पाटील, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संस्थेचे सचिव तुषार पाटील शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सदाशिव कुंभार,जगन्नाथ किर्दत, नंदकिशोर जगताप, स्कूल कमिटी चेअरमन वत्सलाताई डुबल,संचालक अॅड.प्रतापराव पवार,प्रल्हाद पवार,हेमकांची यादव, प्रतिभा चव्हाण,धनंजय जगताप,अॅड. भीमराव फडतरे आणि रवींद्र जाधव तसेच संस्थेचे सर्व हितचिंतक माजी मुख्याध्यापक,तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय संस्थेच्या सर्व शाखेतील मुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी गण मोठ्या संख्येने उपस्थित होता.ज्या महान व्यक्तींनी आपल्या संस्थेची स्थापना केली. त्यांच्या स्मृती विद्यमान संचालक मंडळाने आणि साहेबराव पाटील प्रतिष्ठानने जागवल्या त्याबद्दल त्यांचे करंजे परिसरात विशेष कौतुक आणि अभिनंदन होत आहे..
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 16th Sep 2022 10:22 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 16th Sep 2022 10:22 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Fri 16th Sep 2022 10:22 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Fri 16th Sep 2022 10:22 am
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Fri 16th Sep 2022 10:22 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Fri 16th Sep 2022 10:22 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 16th Sep 2022 10:22 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Fri 16th Sep 2022 10:22 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Fri 16th Sep 2022 10:22 am
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Fri 16th Sep 2022 10:22 am









