आंबेनळी घाटात तब्बल 8 फूट लांबीचे अजगर
Satara News Team
- Sat 11th May 2024 11:13 am
- बातमी शेयर करा
प्रतापगड : सह्याद्रीच्या खोर्यातील महाबळेश्वर व प्रतापगड परिसरातील घनदाट जंगलातील जैवविविधता ही निसर्गप्रेमींसाठी खास पर्वणीच असते. या ठिकाणी अनेक दुर्मिळ प्राणी, सर्प आढळतात. नुकताच या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध तब्बल 8 फूट लांबीचे अजगर प्रवाशांना आढळून आला आहे. रस्ता ओलांडताना प्रवाशांना गाडीच्या प्रकाशात पाहायला मिळाला.
मंगळवारी रात्री प्रतापगडहून परत येत असताना महाबळेश्वरमधील काही स्थानिकांना रस्ता ओलांडत असणारा तब्बल 8 फुटाच्या अजगराचे दर्शन झाले. एवढे मोठे अजगर पाहिल्यानंतर प्रवाशी घाबरले मात्र अजगर मंदगतीने रस्ता ओलांडत होते. लाईटच्या झोतामुळे अजगर खूप एकाच जागी थांबले होते. त्यामुळे अजगराने रस्ता ओलांडेपर्यंत प्रवाशांना बराच वेळ वाटही पहावी लागली. मात्र एका दुर्मिळ क्षणाचे साक्षीदार होत प्रवाशांनी हा थरार अनुभवला.
सह्याद्री पर्वत रागांचाच एक भाग असल्याने या रांगाचा महाबळेश्वर तालुक्यात बराच मोठा भाग हा जंगलांनी वेढला आहे. बरेच वन्य जीव या भागात आढळत असतात. महाबळेश्वर येथे सापांच्या बर्याच प्रजाती आढळून येत असून बिनविषारी सापामधील सर्वात मोठी प्रजाती म्हणजे भारतीय अजगर हे होय
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sat 11th May 2024 11:13 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sat 11th May 2024 11:13 am
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Sat 11th May 2024 11:13 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sat 11th May 2024 11:13 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sat 11th May 2024 11:13 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sat 11th May 2024 11:13 am
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Sat 11th May 2024 11:13 am
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Sat 11th May 2024 11:13 am
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Sat 11th May 2024 11:13 am
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sat 11th May 2024 11:13 am
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Sat 11th May 2024 11:13 am
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Sat 11th May 2024 11:13 am
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Sat 11th May 2024 11:13 am
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Sat 11th May 2024 11:13 am











