सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध... नूतन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Satara News Team
- Fri 9th Jun 2023 03:49 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारचे नवीन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पत्रकारांकडून साताऱ्यातील विविध प्रश्न ऐकून घेतले. साताऱ्यातील महत्त्वाच्या प्रश्न पत्रकारांकडून जाणून घेतले आणि या प्रश्नांवर नक्कीच विचार करून योग्य ते निर्णय घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही अशी भूमिका या पुढील काळात घेण्यात येईल असा विश्वास दिला.
सातारा हा निसर्ग संपन्न जिल्हा आहे एका बाजूला मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे तर दुसऱ्या बाजूला दुष्काळ आहे अशा भौगोलिक दृष्ट्या विविधतेने संपन्न असलेल्या सातारा जिल्ह्याचा विकास हा येणाऱ्या काळात नक्कीच करण्यात येईल सर्वसमावेशक सर्व लोकांना बरोबर घेऊन सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहणार आहे असे प्रतिपादन नूतन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत केले.
महाबळेश्वर कास पाचगणी येथील अतिक्रमण बाबत ही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली . या भागातील सर्व कागदपत्रांची छाननी ही मी स्वतः करणार असून कायद्याच्या आदेशाचा सर्वोच्च सन्मान राखला जाणार असून कायद्याप्रमाणे जी काय आवश्यक कारवाई आहे ती ही केली जाणार आहे. तसेच निसर्गाचा ही समतोल राखण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे कुणाच्याही पोटावर विनाकारण पाय येऊ नये याची खबरदारी ही माझं प्रशासन घेईल अस आवर्जून जिल्हाधिकारी डुडी यांनी पत्रकारांना सांगितले.
तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी महाबळेश्वर पाचगणी बाबत केलेला आराखडा याची अंमलबजावणी ही मी करणार असून मावळते जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कायद्याप्रमाणे जी पावले उचलली आहेत त्याचा पाठपुरावा करून त्याची अंमलबजावणी करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.एकंदरच नवे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज साताऱ्यातील पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा केल्या व येणाऱ्या काळात पत्रकारांशी संवाद हा कायम ठेवला जाईल असे आवर्जून सांगितले
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Fri 9th Jun 2023 03:49 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Fri 9th Jun 2023 03:49 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 9th Jun 2023 03:49 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Fri 9th Jun 2023 03:49 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Fri 9th Jun 2023 03:49 pm
संबंधित बातम्या
-
खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
- Fri 9th Jun 2023 03:49 pm
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 9th Jun 2023 03:49 pm
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Fri 9th Jun 2023 03:49 pm
-
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Fri 9th Jun 2023 03:49 pm
-
पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...
- Fri 9th Jun 2023 03:49 pm
-
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Fri 9th Jun 2023 03:49 pm
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Fri 9th Jun 2023 03:49 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी मतेंवर गोरे अंकुश ठेवणार? कि पोलिस अधीक्षक दोषी ठरवणार?
- Fri 9th Jun 2023 03:49 pm












