शिक्षण प्रसारक संस्थेच्या आर्चरी अकॅडमीचे शस्त्रपूजन उत्साहात संपन्न.

सातारा  : सातारा शहराजवळील आपल्या नाविन्यपुर्ण उपक्रमांनी नावारुपाला आलेल्या शिक्षण प्रसारक संस्थेच्या आर्चरी अकॅडमीचे दस-यानिमित्त शस्त्रपूजन संपन्न झाले..त्यावेळी संस्थेचे सचिव तुषार पाटील, संचालिका प्रतिभा चव्हाण,श्रीपतराव पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक अमर वसावे,आर्चरी खेळाचे प्रशिक्षक सुशांत साळुंखे,आर्चरी खेळाचे खेळाडू आणि त्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते..
   या प्रशिक्षण केंद्रात शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रीपतराव पाटील हायस्कूल,आदर्श विद्यामंदिर,न्यू इंग्लिश मीडियम स्कूल आणि माणिक कासट बालकमंदिर या शाखांमधील विद्यार्थी विनामूल्य प्रशिक्षण घेत असतात.. हे प्रशिक्षण केंद्र संस्थेचे सचिव तुषार पाटील यांच्या प्रोत्साहनामुळे व आर्चरी प्रशिक्षक सुशांत साळुंखे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे..विद्यार्थ्यांच्या पालकांच्या विशेष सहकार्यामुळे आणि विद्यार्थ्यांच्या अपार कष्टामुळे ह्या अकॅडमीने आर्चरी खेळप्रकारात आज पर्यंत १५० राज्य व राष्ट्रीय पदके मिळविली आहेत तर पार्थ साळुंखे सारखा आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविला आहे.आर्चरी  ऑलिंपिक स्पर्धेमध्ये तो भारताचे प्रतिनिधित्व करेल असा संस्था व शाळेला विश्वास वाटतो.या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या आर्चरी अकॅडमीची खेळाडू कु.सांचिता नाईक हीचा व तिच्या पालकांचा सत्कार तुषार पाटील यांनी केला .विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या पदकांचे व टारगेटचे पूजन झाले..शस्त्रपूजन तुषार पाटील यांच्या हस्ते तर टारगेट पूजन संस्था संचालिका प्रतिभा चव्हाण यांचे हस्ते संपन्न झाले.याचवेळी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या मेडल व ट्रॉफीजचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते..

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला