देऊर येथे विजेचा शॉक लागून शेतकऱ्यासह गाईचा मृत्यू....
Satara News Team
- Thu 1st Aug 2024 09:51 pm
- बातमी शेयर करा
कोरेगाव : देऊर ता.कोरेगाव येथे गायी चारत असताना, विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह ,गाईचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अनिल मारुती कदम (वय ६० ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळ व वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देऊर येथील शेतकरी अनिल कदम हे आज गुरुवार दि, १ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास गाई चारण्यासाठी देऊर येथील सातारा - लोणंद महामार्गा लगत नवीन प्लॉटिंग असलेल्या गट नंबर ६२३ मध्ये गेले होते. या प्लॉटमध्ये नवीन घराचे बांधकाम चालू असून या बांधकाम कामासाठी शेजारी असलेल्या विहिरी वरून जमिनीवर केबल टाकून लाईट कनेक्शन घेतले होते. दरम्यानच्या काळात गाई चारत असताना चरत असलेल्या गाईचा जमिनीवर पडलेल्या इलेक्ट्रिक वायरला स्पर्श झाला व त्यावेळी शॉक लागल्याने जर्सी गाय जागेवरच पडली. गाय का पडली म्हणून बघायला गेलेल्या अनिल कदम यांना सुद्धा विजेचा धक्का लागून तेही जागीच मृत झाले सदर घटनेची फिर्याद योगेश लक्ष्मण चव्हाण वय ३५ रा. पाटखळ यांनी वाठार पोलिसात दिली असून तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Thu 1st Aug 2024 09:51 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Thu 1st Aug 2024 09:51 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Thu 1st Aug 2024 09:51 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Thu 1st Aug 2024 09:51 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Thu 1st Aug 2024 09:51 pm
संबंधित बातम्या
-
पुसेगाव पोलीसांनी रेस्क्यु टीमच्या मदतीने नेर तलावत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधून बाहेर काढला
- Thu 1st Aug 2024 09:51 pm
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Thu 1st Aug 2024 09:51 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Thu 1st Aug 2024 09:51 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Thu 1st Aug 2024 09:51 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Thu 1st Aug 2024 09:51 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Thu 1st Aug 2024 09:51 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Thu 1st Aug 2024 09:51 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Thu 1st Aug 2024 09:51 pm













