मृद व जलसंधारण विभागाचा निविदा रद्द केल्याने सातारा जिल्ह्यात ठेकेदारांची धावपळ

नुतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहिरातबाजी करून काहींनी जवळीक दाखविण्याचा प्रयत्न केला पण, अखेर निविदा प्रक्रिया रद्द करून सातारा जिल्ह्यातील सुमारे दोनशे कोटी रुपयांचा निधी वाचविण्याचा शिव पराक्रम मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे.  

सातारा : मृद व जलसंधारण  विभागामार्फत जलयुक्तशिवार योजनेअंतर्गत अनेक बंधाऱ्यांची कामे केली आहेत परंतु ही कामे करताना भ्रष्टाचार केला आहे.या आरोपाचे पुरावे सादर केल्याने मृद व जलसंधारण विभागाचा निविदा रद्द केल्याने ठेकेदारांची धावपळ सुरू झाली आहे.  सातारा जिल्ह्यात राजकीय पक्षांची सलगी करून ठेका मिळविणाऱ्यांना यामुळे चांगलाच चाप बसलाआहेसातारा जिल्ह्यातील कृष्णा खोरे विकास महामंडळाची कामे,सिंचन प्रकल्प संबंधित ठेकेदारांना आदण दिल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती.काही लोकप्रतिनिधी यांचे जवळचे नातेवाईक कम पुढारी, ठेकेदार,दलाल यांनी अक्षरशा लूट सुरू केली होती.काही राजकीय पक्षांनी या कार्यालयातील भ्रष्टाचाराचे जनक असलेल्या काही अधिकाऱ्यांच्या हातीच सूत्र दिली होती. स्थानिकांना फक्त नाला दुरुस्ती, नाल्याची कामे मिळत होते. तर कालवे, बंधारे अशी मोठी कामे प्रस्थापित वर्ग वाटून घेत होते. नुतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहिरातबाजी करून काहींनी जवळीक दाखविण्याचा प्रयत्न केला पण, अखेर निविदा प्रक्रिया रद्द करून सातारा जिल्ह्यातील सुमारे दोनशे कोटी रुपयांचा निधी वाचविण्याचा शिव पराक्रम मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे.  मृद व जलसंधारण विभागाचे प्रामाणिक अधिकारी वर्ग खुश झाले आहेत.सातारा जिल्ह्यातील वादग्रस्त १४७ कामांची माहिती सामाजिक कार्यकर्ते यांनी यापूर्वीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठवली होती.त्याबाबत योग्य निर्णय घेण्यात आला आहे.

                          सातारा जिल्ह्यातील मृद व जलसंधारण कार्यालयाने काही बंधारे बांधले. बंधारे बांधताना ठेकेदारांनी वाळू,स्टील न वापरणे, पाया न बांधता बंधाऱ्याचे काम केले. ती कामे ढासळून पडली होती.दुरुस्तीच्या नावावर  काम न करताच देयक अदा केलेली आहेत. लाखो रुपयांची उधळण केली आहे व मर्जीतील ठेकेदारांना कामे देणे व अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना कामे देणे, निवृत्त झालेले अधिकारी विनापरवाना कार्यालयात ठेकेदारांची कामे पैसे घेऊन करतात. याची ही तक्रार  सामाजिक कार्यकर्ते तुषार मोतलिंग यांनी केली असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे निविदा स्थगिती दिलेली आहे. आता भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टचाराची विभागीय चौकशी करावी. या चौकशीला तक्रारदार यांना पुरावे सादर करण्याचे लेखी पत्र पाठवावे. त्यानंतर चौकशीत काय झाले?याची माहिती दयावी अशी ही मागणी करण्यात आली आहे. गेली पंचवीस वर्षे सिंचन भवन मध्ये भ्रष्टाचार दुथडी भरून वाहत आहे. अखेर न्याय मिळाला अशी ही भावना अनेक तक्रारदार यांची झाली आहे. निविदा प्रक्रिया रद्द झाल्याने आता दिलेल्या उचल बाबतीत सिंचन भवन व अधिकाऱ्यांच्या घरी काही ठेकेदारांनी तगादा लावल्याचे चित्रीकरण सि सि टी व्ही त दिसत असल्याने पाठीशी घालणारे पुढारी व दलाल तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांची बोलती बंद झाल्याचे सांगितले जात आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला