साताऱ्यात ऊस दर प्रश्नबाबत रयत क्रांती संघटना आक्रमक

सातारा : सातारा जिल्ह्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्याचा बॉयलर पेटला आहे. उसाचे गाळप सुरू असून वाहतूकही मोठ्या प्रमाणात केली जात आहे .परंतु, अद्यापही प्रति टन उसाचा दर जाहीर केला नाही. याबाबत प्रशासनाने तातडीने बैठक लावावी. अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. सध्या उसाला दर देण्याच्या मागणीसाठी शेतकरी वर्ग रयत क्रांती संघटने कडे संपर्क साधत आहे. त्यामुळे सन २०२५ च्या ऊस गळीत हंगाम शांततेत व्हावा.

     यासाठी रयत क्रांती संघटनेने सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. पंधरा दिवस होऊन सुद्धा अद्यापही कोणत्याही साखर कारखान्याने किमान दर उसाचा न ठरवल्यामुळे शेतकऱ्यांना आता रस्त्यावर उतरावे लागणार आहे. तत्पूर्वी लोकशाही मार्गाने शासकीय पातळीवर बैठक होणे गरजेचे आहे. ज्यावेळी शेतकऱ्याच्या शेतातून ऊस घेऊन गेला की त्यानंतर १४ दिवसात सदर उसाची रक्कम त्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा करणे बंधनकारक आहे. परंतु अद्यापही याबाबत ठोस भूमिका घेतली नसल्यामुळे रयत क्रांती संघटनेने तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. असे यावेळी सांगण्यात आले. सदर बैठक घेण्याबाबतचे निवेदन सातारचे अपर जिल्हा अधिकारी जीवन गलांडे यांना रयत क्रांती संघटनेचे अनिल बाबर ,नामदेव कदम, सूर्यकांत नलावडे ,किशोर शिंदे व स्वतः रयत क्रांती संघटनेचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश साबळे उपस्थित होते. यावेळी सातारा शहर पोलीस निरीक्षक यांनाही प्रत देण्यात आलेली आहे.-----------------

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला