32 वर्षानंतर भेटले वर्गमित्र
सतिश जाधव - Wed 29th May 2024 11:39 am
- बातमी शेयर करा
देशमुखनगर : सातारा तालुक्यातील अंगापूर हायस्कूल च्या 1992 च्या इयत्ता दहावी च्या बॅच चे वर्गमित्र आज 32 वर्षानंतर भेटले आणि शालेय आठवणीत रंगून गेले आणि गेल्या काही दिवसापासून प्रतीक्षा असलेले गेट-टुगेदर अखेर संपन्न झाले.
32 वर्षानंतर आम्ही भेटणार होतो त्यामुळे थोडा दबाव होता , थोडी प्रतीक्षा होती, थोडे दडपण होते पण हे सर्व एकत्र येण्याने एका क्षणात निवळून गेले. आणि निर्माण झाले .आत्मीयतेचे आपुलकीचे, खेळकर आणि खोडकर वातावरण.
सकाळी परिचयाचे सत्र साधारण तीन तास चालले. नाव, गाव, व्यवसाय, मुलं - बाळ, सुख- दुःख, संघर्ष आणि स्थैर्य आदी विषय चालू होते. कधी हास्याचा कल्लोळ तर कधी भावनिक करणारे प्रसंग सांगून पारिवारिक वातावरण निर्माण झाले .
सकाळ चा रुचकर नाष्टा, दुपारचे चटपटीत जेवण, चहा,कॉपी, थंड, आणि सायंकाळ चे कलिंगड असा जिभेचे चोचले पुरवणारा आहार.
हळू हळू वातावरण हलके फुलके होत गेले आणि मग सुरू झाला गाण्याचा आणि गप्पांचा कार्यक्रम .
संतोष शेडगे, शहाजी , जोतिराम , अविनाश, संजय, पिन्या आणि मंगेशने गायलेल्या गाण्यांनी आणखी मजा आली.
कधी ही हातात माईक न धरता बोललेले अनेक मित्र उभे राहून बोलले आणि मनातील भावनानां वाट मोकळी करून दिली.
कार्यक्रम फारच भारी झाला .
15 वर्षे अबोला असलेले दत्ता ढाणे आणि चंद्रकांत कणसे एकमेकाला गळ्यात पडून भेटतात आणि मनातील मळभ दूर होते. ज्या भरत बरोबर मी दुरव्याने रहात होतो तो भरत जेव्हा म्हणतो संतोष तुझा अभिमान आहे, तेव्हाच या कार्यक्रमाचे खरे फळ मिळाले असे म्हणावे लागेल.
अनुपस्थित असलेल्या किरण शेडगे, संतोष विष्णू शेडगे यांच्या सह अनेक मित्रांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.
निगडीच्या शहाजी ने राग भैरवित गायलेल्या अभंगामुळे निरोप घेताना सर्वांची मने अजूनच कातर झाली.
पुन्हा भेटण्याच्या वचनाने कार्यक्रमचा समारोप झाला.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 29th May 2024 11:39 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 29th May 2024 11:39 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Wed 29th May 2024 11:39 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 29th May 2024 11:39 am
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Wed 29th May 2024 11:39 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Wed 29th May 2024 11:39 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 29th May 2024 11:39 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Wed 29th May 2024 11:39 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Wed 29th May 2024 11:39 am
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 29th May 2024 11:39 am









