आ. महेश शिंदे यांच्या करिष्म्यापुढे राष्ट्रवादी घायाळ
रणनिती बदलली नाही तर आ. शशिकांत शिंदेंचे भवितव्य धोक्यातओमकार सोनावणे
- Thu 22nd Sep 2022 07:49 am
- बातमी शेयर करा
सातारा ; कोरेगाव विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचा गड मानल्या गेलेल्या खेड ग्रामपंचायतीची सत्ता खेचून घेवून आमदार महेश शिंदे यांनी मोठा विजय संपादन केला आहे. राष्ट्रवादीच्या गडाला हादरे देवून त्यांनी आपला मतदारसंघ मजबूत केला आहे. आ. महेश शिंदे यांची विजयी घौडदौड रोखणे राष्ट्रवादीला आता कठीण झाले आहे. अतिशय वेगळे डावपेच लढवून विरोधकांना हादरे देण्यात आ. महेश शिंदे यांचा हातखंडा तयार झाला आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आता महेश शिंदे यांचा विजयरथ रोखणे सहज कोणालाही शक्य होईल, अशी परिस्थिती दिसत नाही. एकाचवेळी तीन ठिकाणी लक्ष केंद्रीत केलेल्या आ. शशिकांत शिंदे यांच्या वाट्याला सातत्याने पराभव येत आहे. लढवय्या कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या आ. शशिकांत शिंदे यांच्यावर आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे. वेळीच त्यांनी आपली रणनिती बदलली नाही तर त्यांचे भवितव्य धोक्यात येवू शकते.
आ. शशिकांत शिंदे यांनी १९९९ मध्ये जावली विधानसभा मतदारसंघात मोठा विजय मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. जावलीचा आमदार ते राष्ट्रवादीचा मोठा नेता असा त्यांचा प्रवास सातारा जिल्ह्याने गेल्या २२ वर्षात बघितलेला आहे. विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर आ. शशिकांत शिंदे यांचा जावली विधानसभा मतदारसंघ सातारा विधानसभा मतदारसंघात विलीन झाला. त्यावेळी आ. शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या मतदारसंघात जावून त्यांनी डॉ. शालिनीताई पाटील यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याचा पराभव करुन विजय मिळवला. २0१४ मध्येही त्यांनी दुसऱ्यांदा या मतदार संघात विजय मिळवला. सलग चारवेळा विधानसभा निवडणूक जिंकल्यामुळे आणि मंत्रिपदावर काम केलेले असल्यामुळे आ. शशिकांत शिंदे यांचा आत्मविश्वास अतिशय दुणावला होता. त्यातच त्यांना चुकीचे सल्ले देण्यात आले होते. मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळेल, असेही त्यांना सांगण्यात आले होते. नको ते लोक त्यांनी बरोबर घेतले होते.
'पीएं'नी केलेल्या करामतीचीही मोठी चर्चा त्यावेळी मतदार संघात होती. मात्र, सगळ्या गोष्टींकडे त्यांनी दुर्लक्ष केले आणि विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. एवढीच कारणे त्यांच्या पराभवाला नाहीत तर दोन राजांच्या कार्यकर्त्यांवर अवलंबून राहणेही त्यांच्या अंगलट आले. कोरेगाव विधानसभा मतदार संघात सातारा तालुक्याचा मोठा भाग येतो. या भागात स्वत:ची कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यात त्यांना मोठे अपयश आले. त्याचाही मोठा फटका विधानसभा निवडणुकीत त्यांना बसला आहे.
खेड, संभाजीनगर अशा दोन मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्यांना दणका बसला आहे. संभाजीनगर ग्रामपंचायतीवर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचेच वर्चस्व होते. त्यामुळे तेथील पराभवाचा आ. शशिकांत शिंदे यांना फार मोठा फटका बसणार नाही. मात्र, खेड हा शशिकांत शिंदे यांचा बालेकिल्ला होता. हा बालेकिल्ला पूर्णपणे उद्ध्वस्त करुन स्वत:च्या ताब्यात घेण्यात महेश शिंदे यांना यश आले आहे. खेडमध्ये आ. शशिकांत शिंदे यांच्या जोडीला दोन आमदारांची ताकद असूनही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आ. शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर तर त्यांची दिशा पूर्णपणे चुकत चालली आहे. त्यांची एकाचवेळी तीन ठिकाणी लक्ष घातले आहे. नवी मुंबई, सातारा आणि कोरेगाव अशा तीन विभागावर लक्ष केंद्रीत केल्यामुळे त्यांच्याविषयी उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्था पसरली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आता दोन वर्षांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. दोन वर्षाचा कार्यकाळ हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे या कार्यकाळात नेमके कोठून लढायचे, याचा निर्णय त्यांना लवकर घ्यावा लागणार आहे. सातारा विधानसभेतून लढणार असले तर कोरेगाव विधानसभा मतदार संघाचा उमेदवार आत्ताच जाहीर करावा लागणार आहे. दोन्ही विधानसभा सोडून ते मुंबईला जाणार असतील तर दोन्ही ठिकाणी कोणी लढायचे हे त्यांना जाहीर करावे लागेल. त्यांची भूमिका अस्थिर राहिली तर कोरेगाव विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीला विजय मिळण्याची शक्यता अतिशय कमी राहिल. उलट राष्ट्रवादीचा मोठ्या फरकाने पराभव होईल. ही वेळ आत्मचिंतन करुन स्पष्ट भूमिका घेण्याची आहे. कार्यकर्त्यांना आणि जनतेला योग्य दिशा दाखवण्याची आहे. अजून वेळ गेली तर राष्ट्रवादीसाठी खडतर आव्हान असेलच, पण आ. शशिकांत शिंदे यांचेही भवितव्य धोक्यात येवू शकते. वेळीच धोका ओळखून आ. शशिकांत शिंदे यांनी पुढची वाटचाल करण्याची गरज आहे.
विजयाचे तंत्र महेश शिंदेंना अवगत
राष्ट्रवादीच्या नंबर एक फळीतील नेते असलेल्या आ. शशिकांत शिंदे यांचा पराभव करुन आ. महेश शिंदे यांनी जायंट किलर असल्याचे दाखवून दिले होते. मात्र, हा विजय अपघात नव्हता हे पुढच्या प्रत्येक निवडणुकीत ते सिध्द करत चालले आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक असो की कोरेगाव नगरपंचायतीची निवडणूक असो विजय कसा खेचून आणायचा याचे तंत्र आ. महेश शिंदे यांनी अवगत केले आहे. खेडमध्ये आ. महेश शिंदे करिष्मा दाखवणार का याची उत्सुकता संपूर्ण सातारा जिल्ह्याला होती. त्याचवेळी तीन आमदार आणि दोन खासदारांची ताकद त्यांच्या विरोधात एकवटली होती. आ. महेश शिंदे यांच्या गटाला विजय मिळू नये यासाठी चारही बाजूने व्यूहरचना तयार झाली होती. मात्र, सगळे चक्रव्यूह भेदून आ. महेश शिंदे यांनी मोठा विजय मिळवला आहे. आ. महेश शिंदे यांचे डावपेच सगळ्यांनाच भारी पडले आहेत.
... तर रोखणे अशक्यप्राय
आ. महेश शिंदे यांचा विजयरथ रोखण्याची कोणतीही यंत्रणा आता विरोधकांच्या हातात राहिली नाही. आ. महेश शिंदे यांची वाटचाल अतिशय वेगाने सुरु आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघावर त्यांनी आपली पकड मजबूत केली आहे. आ. शशिकांत शिंदे यांनी केलेल्या चूकाही टाळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कोरेगाव मतदार संघातील सातारा तालुक्यात स्वत:चा गट निर्माण करण्यात ते यशस्वी होत चालले आहेत. स्वत:च्या कार्यकर्त्यांची फळी उभी करुन आ. महेश शिंदे यांनी भविष्यातही आपल्याला कोणीही आव्हान देवू शकणार नाही, अशी व्यवस्था उभी केली आहे. आ. महेश शिंदे यांना रोखणे आता कठीणच नव्हे तर अशक्यप्राय होत जाणार आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 22nd Sep 2022 07:49 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 22nd Sep 2022 07:49 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 22nd Sep 2022 07:49 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 22nd Sep 2022 07:49 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 22nd Sep 2022 07:49 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 22nd Sep 2022 07:49 am
संबंधित बातम्या
-
पदांसाठी मुलाखतींना चंद्रकांत जाधव यांचा कडाडून विरोध
- Thu 22nd Sep 2022 07:49 am
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Thu 22nd Sep 2022 07:49 am
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 22nd Sep 2022 07:49 am
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Thu 22nd Sep 2022 07:49 am
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Thu 22nd Sep 2022 07:49 am
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Thu 22nd Sep 2022 07:49 am
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Thu 22nd Sep 2022 07:49 am
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Thu 22nd Sep 2022 07:49 am













