खंडाळा सेतू घोटाळ्यामुळे जिल्हाधिकारी सातारा यांच्या कार्यालयात महिती अधिकार जनजागृति केंद्र यांच्या वतीने अर्ध नग्न मोर्चाचे निवेदन...
Satara News Team
- Fri 31st May 2024 06:20 pm
- बातमी शेयर करा
खंडाळा : खंडाळा सेतू घोटाळा प्रकरणातील दोषी घटक घटनांची कसून खाते निहाय चौकशी करून दोषी आहेत त्या सेतू ऑपरेटर यांना निलंबनासह दंडात्मक कारवाई करत नागरिकांचे झाले नुकसान भरपाई मिळावी असे महिती अधिकार कायदा जनजागृति अभियान केंद्राचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष श्री. सुनीलकुमार बावधनकर यांनी म्हणले आहे.
सविस्तर वृत्त असे की, २८/०५/२०२३ या दिनांकास त्यांच्या मुलाचे शैक्षणिक कामकाजाकामी उत्पन्नाचा दाखला माननीय तहसीलदार साहेब खंडाळा यांच्या कार्यालयातील सेतू विभागात ऑपरेटर मुकेश सपकाळ यांना मागितला परंतु तहसीलदार श्री. अजित पाटील आणि त्यांचे सहकाऱ्यांचे भ्रष्ट कामकाजाबद्दल मागील आठ महिन्यापासून मी पुराव्यासह लेखी तक्रार दाखल केल्यामुळे खंडाळा तहसीलदार, व सेतू घोटाळ्यातील मुख्य आरोपी मुकेश सपकाळ यांनी मला १००० रुपयाची लाच मागितली व जाणीवपूर्वक हेतू पुरस्कर सदर उत्पन्नाच्या दाखल्याचे कामकाज व इतर कामकाज जाणीवपूर्वक हेतू पुरस्कर दाखल केलेल्या तक्रारी अर्ज विनाकारवाई माघार घेत नाही म्हणून कर्तव्यात कसूर करत अधिकाराचा गैरवापर करून नागरिकांचे कामकाज जाणीवपूर्वक हेतूने पूर्ण करून देत नाहीत. तथा त्यामध्ये टाळाटाळ करून नागरिकांना वारंवार वरिष्ठांकर तक्रार करण्यास भाग पाडतात.
त्यामध्ये नागरिकांचे दररोजचे हजारो रुपये नुकसान होत असून हे सर्व नुकसान तहसीलदार खंडाळा व त्यांचे इतर कर्मचारी जे डी. एस. सी. वापरतात तसेच सेतू आणि इतर गंभीर भ्रष्ट प्रकरणांची त्यांनी स्वतः पोलखोल केली असून त्याची चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांचे आदेशानुसार प्रलंबित असून तहसीलदार खंडाळा व त्यांचा सेतू विभाग हे जाणीवपूर्वक उत्पन्नाचे दाखले प्रलंबित ठेवत इतरांचे जे जास्त शुल्क देतात त्यांचे उत्पन्नाचे दाखले पूर्ण करीत असून रात्री अकरा वाजेपर्यंत भाडे तत्त्वावर डी.एस.सी. वापरणाऱ्या तोतया बोगस तहसीलदारांच्या माध्यमातून जे पैसे व लाच देतील त्यांचे उत्पन्नाचे दाखले दिले जातात व जे पैसे देत नाहीत व लाच देत नाहीत त्यांचे दाखले जाणीवपूर्वक अटकवून ठेवतात. सदर प्रकरणामध्ये खंडाळा तहसीलदार व सेतू ऑपरेटर मुकेश सपकाळ, आदिनाथ देवकाते, सुलतान शेख यांचे विरुद्ध पुराव्यासह लेखी तक्रार दाखल करून तक्रारी झाल्या होत्या.
या सर्व खंडाळा सेतू घोटाळ्यामुळे खंडाळा तहसिलदार व नागरी सुविधा केंद्र सेतू खंडाळा यांच्या विरोधात दि. ११/०६/२०२४ रोजी जिल्हाधिकारी सातारा यांच्या दालनात अर्धनग्न मोर्चा काढण्यात येणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Fri 31st May 2024 06:20 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Fri 31st May 2024 06:20 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Fri 31st May 2024 06:20 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 31st May 2024 06:20 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Fri 31st May 2024 06:20 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Fri 31st May 2024 06:20 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Fri 31st May 2024 06:20 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Fri 31st May 2024 06:20 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Fri 31st May 2024 06:20 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 31st May 2024 06:20 pm













