पांचगणीतील स्वातंत्र्य सैनिक ओंबळे सरकार यांचा बंगला हडपणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश : पालकमंत्री शंभूराजे देसाई

स्वातंत्र्य सैनिक बाबूराव ओंबळे यांच्या मोडकळीस आलेल्या घरावरील कब्जा काढून धोकादायक झालेली इमारत उतरवून घेण्यासाठी मदत करावी यासाठी स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबीयांनी घेतली पालकमंत्री व आमदारांची भेट

पांचगणी : देश स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक बाबूराव ओंबळे यांच्या मोडकळीस आलेल्या घरावरील कब्जा काढून धोकादायक झालेली इमारत उतरवून घेण्यासाठी शासनाने मदत करावी यासाठी स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबीयांनी घेतली पालकमंत्री शंभुराजे देसाई व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
आंब्रळ तालुका महाबळेश्वर येथील स्वातंत्र्यसैनिक बाबुराव रामचंद्र ओंबळे (सरकार) यांची पांचगणी येथील जागा भाडेकरूं हडप करू पाहत असल्याने त्यांची नात आता न्यायासाठी धडपडत आहे.
ओंबळे (सरकार) यांची नात क्रांती मांढरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सातारा दौऱ्यात त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला त्यांची भेट होऊ न शकल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांची भेट घेवून त्यांनी आपली व्यथा मांडली. यावेळी पालकमंत्र्यांनी तातडीने पांचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना फोन करून दोघांनी मिळून यात लक्ष घालावे व ओंबळे सरकार यांच्या कुटुंबियांना योग्य तो न्याय द्यावा असे आदेश दिले.
त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला त्यांची भेट होऊ न शकल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांची भेट घेवून त्यांनी आपली व्यथा मांडली. यावेळी पालकमंत्र्यांनी तातडीने पांचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना फोन करून दोघांनी मिळून यात लक्ष घालावे व ओंबळे सरकार यांच्या कुटुंबियांना योग्य तो न्याय द्यावा असे आदेश दिले.
त्याच बरोबर सौ. मांढरे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली त्यांनी क्रांती मांढरे यांचेशी चर्चा केली. चर्चेदरम्यान आ. भोसले यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि स्व. अभयसिंहराजे भोसले आणि ओंबळे सरकार यांनी जिल्हा बँकेत दहा ते पंधरा वर्ष एकत्र काम केले. त्यामुळे सरकारांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. अशी भावना व्यक्त केली.

१९४६ साली पांचगणी येथील मालमत्ता क्रमांक W- 4000334, फायनल प्लॉट 14, गावठाण, हिंद निवास हे घर ओंबळे सरकार यांनी बांधले आहे. सध्या वारस हक्काने ही मालमत्ता त्यांच्या नात क्रांती संतोष मांढरे यांच्या नावे आहे. दरम्यान आजोबांनी हे घर अझीझ दाउद कुरवले आणि जैनुद्दीन पावसकर यांना भाड्याने दिले होते. यातील जैनुद्दीन पावसकर हे मयत झाल्यानंतर त्यांचा मुलगा इरफान पावसकर याने हे घर परस्पर दुसऱ्याला भाड्याने दिले. त्यामुळे क्रांती मांढरे यांनी घराचा ताबा मिळावा यासाठी सरकार दरबारी धाव घेतली परंतु कुठेच न्याय मिळत नसल्याने आज त्यांनी थेट मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. पालकमंत्री यांनी यात लक्ष घातल्याने आता हा प्रश्न सुटेल असा आशावाद क्रांती मांढरे यांनी व्यक्त केला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला