गोंदवले ग्रामप्रशासन कोमात ; रोगराई मात्र जोमात

उघड्या गटारांतील डासांच्या फैलावाने साथीच्या रोगांची शक्यता
Gondavale village administration comatose; But the disease is in full swing

गोंवले बु :  ता.माण या ठिकाणी आरोग्याच्या प्रश्न ग्रामप्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे कारण गावागावात असलेल्या उघड्या गटारांच्या माध्यमातून सांडपाण्यातून निर्माण झालेल्या डासांच्या फैलावाने गावात दाट रोगराई पसरण्याची शक्यता व रोगराईचा फटका लहान मुलांना बसण्याची शक्यता ही निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्य प्रश्नी कोमात असलेले ग्रामप्रशासन जागे होऊन जोमात असलेल्या रोगराईला थोपवण्यात यशस्वी होणार का ? हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे.माण तालुक्यासह सर्वत्र पावसाची मुसळधार नसली तरी रिपरिप सुरू आहे. त्यामुळे गावागावात साठलेल्या गटारातील सांडपाण्यातून निर्माण झालेल्या डासांच्या फैलावाने रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सातारा पंढरपूर रोडवर असलेल्या गोंदवले नगरीतील असणारी गटारे सताड उघडी पडलेली आहेत त्यामुळे गटाराच्या माध्यमातून वाहून जाणारे सांडपाणी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या डासांच्या फैलावाने साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे त्यामुळे या आजारांना बळी पडण्याची वेळ गावातील नागरिकांवर आलेली आहे.त्याचबरोबर मुख्य रस्त्यालाही अर्धवट कामामुळे गटाराचेच स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसत आहे. मुख्य रस्ता असल्याने रस्त्यावर असणारी वाहनांची रहदारी आणि वरून पडणाऱ्या पावसाच्या सततच्या रिपरिपीमुळे साठलेल्या पाण्यातून देखील डासांची उत्पत्ती होत असून या डासांच्या माध्यमातून कावीळ, मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांना आयतेच आमंत्रण मिळत आहे.या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करणारे ग्रामप्रशासन आता तरी या बाबीकडे लक्ष देत गटारांची दुरुस्ती करून सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावून साथीच्या रोगांपासून गावाला वाचवणार का ? गावात साथीचे रोग निवारणात्मक औषध फवारणी करणार का?  हा सवाल गावकरी करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला