महामार्गावर झाला दारुचा टँन्कर पलटी,वाहतुकीची मोठी कोंडी

सातारा  ; पुणे सातारा महामार्गावर शिवरे ता.भोर गावच्या हद्दीत अल्कोहल वाहतुक करणारा टँन्कर पलटी झाला असुन रस्त्यामध्येच टँन्कर अडवा झाल्या मोठी वाहतुक कोंडी झाली आहे,महामार्ग वाहतुक पोलिस व राजगड पोलिस क्रेनच्या सहाय्याने टँन्कर बाजुला करुन वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

पुणे सातारा महामार्गावर शिवरे गावच्या हद्दीत शिवरे फाट्यावर उड्डाणपुलाचे काम चालु असुन त्यासाठी दोन्ही बाजुची वाहतुक सेवा रस्त्याने वळवण्यात आली आहे.आज ता.23 रोजी सकाळी सातारा बाजुकडुन पुणे बाजुकडे जाणारा टँन्कर क्र. एम एच 48 बी एम 4132 हा उ्डडाणपुलाच्या कामाच्या ठिकाणी सेवा रस्त्यावर वळत असतानाच पलटी झाला अरुंद सेवा रस्त्यावर टँन्कर पलटी झाल्याने सर्वच वाहतुक थांबली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रस्ता मोकळा करण्यासाठी कार्यवाही चालु केली आहे

या अपघातामुळे महामार्गवरील वाहतुक पुर्ण ठप्प झाली असुन वाहतुक कोंडी दुर करण्यासाठी महामार्ग पोलिस व राजगड पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी असुन चार क्रेनच्या सहाय्याने टँन्कर सरळ करण्याचे काम चालु आहे.टँन्कर मध्ये अल्कोहोल असल्याने कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी अग्निशमन दलाची गाडी देखिल या ठिकाणी तैनात करण्यात आल्याची माहीती महामार्ग वाहतुक शाखेचे सहाय्यक निरीक्षक अस्लम खातिब यांनी दिली.

वाहतुक कोंडीने सकाळ सकाळ पुणे शहराकडे जाणारया नागरीकांची मोठी अडचण झाली असुन वाहनांच्या रांगा वरवे गावा पर्यंत पोहचल्या आहेत टँन्कर अवजड असल्याने दुर करण्यासाठी वेळ लागत असुन पर्यायी रस्ता करता येतो आहे काय यासाठी देखिल वाहतुक पोलिस प्रयत्न करत असल्याचे सागण्यात आले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला