विरमाडे गावचे आदर्श व्यक्ती महत्व श्री प्रकाश सोनावणे सर
बापू वाघ - Wed 9th Nov 2022 08:17 am
- बातमी शेयर करा
वाई : विरमाडे ता वाई गावचे सुपूत्र यशवंत शिक्षण संस्था सुरूर चे बाळासाहेब पवार हायस्कूल उडतरे या शाळेचे क्रीडाशिक्षक स्काऊट गाईडचे मास्टर, व शारीरिक शिक्षण संघटना वाई चे उपाध्यक्ष श्री प्रकाश प्रल्हाद सोनवणे सर दोन दिवसापूर्वीआसनगाव ता कोरेगाव वरून सातारच्या दिशेने येत असताना शेरेवाडी व मापरवाडी धरणाच्याजवळ रस्त्यालगत त्यांना दोनवर्ष वयाचे कासव दिसून आले यावेळी काही वाहानधारक त्या कासवाजवळ उभी होती
मात्र सोनवणे सर यांनी त्या व्यक्तींना त्या कासवाला हात लावू नका मला वनविभागाच्या ताब्यात दयायच आहे
अस सांगुन सोनावणेसर यांनी सातारा येथील वनभवन येथे संपर्क साधून वनरक्षक चव्हाण साहेब व पवारसाहेब यांच्याशी फोनवर संपर्क करून ते कासव वनविभागाच्या ताब्यात देऊन कासवाचा प्राण वाचण्याचा प्रयत्न केला त्यानंतर वनरक्षक यांनी मेडिकल करून कासवाला अज्ञात वासात सोडल्याचे सोनावणे यांना सांगण्यात आले अशी माहीती श्री सोनावणे सर यांनी सातारा न्यूज प्रतिक्रिया देताना व्यक्त केली
प्रकाश सोनावणे यांना समाजसेवेची पहील्यापासुन आवड असल्यामुळे अनेक सामाजीक संस्थानी त्यांच्या कार्याची दखल घेवून मानपत्र स्मृतीचिन्ह देवून त्यांचा गौरव केल्याचे समोर येत आहे
पाच सहा वर्षापुर्वी सातारा पुणे रस्त्यावर डिमार्ट जवळच अपघात घडला होता त्यावेळी जखमींना वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते
तसेच गौरीशंकर कॉजेल जवळील डोंगराच्या पायथ्याशी गवताला अचानक लागलेली आग विझवण्यासाठी स्वता प्रयत्न करून नंतर वन विभागाला कळवत मोठी दुर्घटना घडता घडता सोनावणे सर यांच्या सतर्कतेमुळे वाचली होती
काही महीन्यापूर्वी सातारा पुणे रस्त्यावर आनेवाडी टोल नाक्याजवळ विरमाडेगावच्या हद्दीत साताऱ्यावरुन पुण्याच्या दिशेने निघालेल्या दुचाकीला अचानक आग लागली होती त्यावेळी रसत्याने जाताना सोनावणे सर यांनी ती गाडी पाहीली व हेल्पलाईन गाडीला व भुईज पोलीस स्टेशन तसेच किसनवीर कारखाना भुईज येथील अग्नीशामक गाडी यांच्याशी वेळीच संपर्क करुन उपाययोजना केली होती .
अशा अनेक घटनेचे ते साक्षीदार आहेत तसेच यशवंत शिक्षण संस्था सुरूर या संस्थेचे ते क्रिडा शिक्षक म्हणून चांगल्या प्रकारे जबाबदारी पार पाडत आहेत याच उत्तम उदाहरण म्हणजे बाळासाहेब पवार हायस्कूल उडतारे येथील मुलामुलींना जिल्हास्थारावर खेळाच्या माध्यमातून चमकवण्याची चांगली कामगिरी ते शाळेचे मुख्याध्यापक श्री बनसोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या ते पार पाडत आहेत

स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 9th Nov 2022 08:17 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 9th Nov 2022 08:17 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Wed 9th Nov 2022 08:17 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 9th Nov 2022 08:17 am
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Wed 9th Nov 2022 08:17 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Wed 9th Nov 2022 08:17 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 9th Nov 2022 08:17 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Wed 9th Nov 2022 08:17 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Wed 9th Nov 2022 08:17 am
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 9th Nov 2022 08:17 am









