राजपुरी रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांचे हस्ते रस्त्याच्या पार पडला

पाचगणी - गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याची दुरवस्था झाली होती.  त्यामुळे या परिसरातील राजपूरी, खिंगर, आंब्रळ, गोडवली येथील रहिवाशांना या खराब रस्त्यावरून ये-जा करावी लागत होती. राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्यांच्या डांबरीकरनास हिरवा कंदील मिळाल्याने या परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

राजपूरी गावाला नुकताच ब वर्ग देवस्थानचा दर्जा मिळाला असून पांचगणी या पर्यटन स्थळाला पर्यटकांनी भेट दिल्यावर राजपुरी या गावातील पुरातन गुहा पाहण्यासाठी पर्यटक येत असतात त्यामुळे हा रस्ता होणे गरजेचे होते. 
या कामाचा आज खिंगर येथे राजेंद्र शेठ राजपूरे यांचे हस्ते नारळ फोडून डांबरीकरणाचा  शुभारंभ करण्यात आला. यावेळी खिंगरचे उपसरपंच विठ्ठल दुधाने, बंडा राजपुरे, रवींद्र पवार , सचिन दुधाने,सचिन राजपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना राजेंद्रशेठ म्हणाले आ. मकरंद पाटील यांच्या माध्यमातून महाबळेश्वर तालुक्यातील प्रत्येक गाव हे चांगल्या  रस्त्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला