कारखेल सरपंच पदी शशिकांत गायकवाड बिनविरोध
धिरेनकुमार भोसले
- Fri 31st May 2024 04:05 pm
- बातमी शेयर करा
दहिवडी :माण तालुक्यातील शेवटचे टोक असणाऱ्या कारखेल ग्रामपंचायतच्या सरपंच पदी शशिकांत गायकवाड व उपसरपंच पदी विश्वनाथ गेजगे यांची बिनविरोध निवड झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की,कारखेल ग्रामपंचायत मध्ये मावळत्या सरपंचांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडी घेण्यात आल्या.या निवडीसाठी घेण्यात आलेल्या बैठकीसाठी नऊपैकी आठ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
यावेळी शशिकांत गायकवाड यांची सरपंच पदी तर विश्वनाथ गेजगे यांची उपसरपंच पदी एकमताने निवड करण्यात आली.निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार व गावातून मिरवणूक काढून फटाक्यांच्या आतषबाजीसह जल्लोष करण्यात आला. सरपंच म्हणून काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असणारे शशिकांत गायकवाड यांची पुन्हा एकदा सरपंच पदी निवड झाली.
निवडीनंतर शशिकांत गायकवाड यांनी गावाच्या विकासासाठी कायम कार्यरत राहणार असून शासनाच्या जास्तीत जास्त योजना गावात राबवण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
शशिकांत गायकवाड हे माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. या बैठकीस सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे आमदार जयकुमार गोरे,अरुण गोरे,सुनील गायकवाड,गोपाळ गायकवाड,रवींद्र गायकवाड,शहाजी गायकवाड,नाना गायकवाड यांनी अभिनंदन केले.
#dahiwadi
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 31st May 2024 04:05 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 31st May 2024 04:05 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 31st May 2024 04:05 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 31st May 2024 04:05 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 31st May 2024 04:05 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 31st May 2024 04:05 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Fri 31st May 2024 04:05 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 31st May 2024 04:05 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 31st May 2024 04:05 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Fri 31st May 2024 04:05 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Fri 31st May 2024 04:05 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 31st May 2024 04:05 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Fri 31st May 2024 04:05 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Fri 31st May 2024 04:05 pm











