बोरगाव पोलीस ठाण्यासमोरील तो अपघात कि आत्महत्या?

शेरेवाडी येथील युवकाच्या मृत्यूवरून शंका; ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद

सातारा : एक युवकाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले जाते, चौकशीनंतर दुपारच्या सुमारास संबंधित युवक पोलीस ठाण्यासमोरच चालू एसटी बसला धडकून जखमी होतो आणि त्याचा मृत्यू होतो. पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद होते. मात्र, हा नक्की आकस्मित मृत्यू, अपघात कि आत्महत्या, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. जर एसटी बसला धडकून त्याचा मृत्यू झाला आहे. तर मग तो अपघात का नाही? कि पोलीस ठाण्यासमोरील हि घटना अंगलट येऊ नये, म्हणून पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. अशा अनेक शंका आता व्यक्त होऊ लागल्या आहेत. 
  याबाबत अधिक माहिती अशी कि, सातारा तालुक्यातील शेरेवाडी गावातील रामदास अनंत गवाणे (वय ४५) या युवकाला गुरुवारी शांतता भंग करत असल्याने चौकशीसाठी बोरगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. मात्र, दुपारी चौकशी झाल्यानंतर सदर युवकाचा पोलीस ठाण्याबाहेरच एसटी बसला धडकून जखमी झाला होता, त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे नेले असता मृत घोषित करण्यात आले. मात्र, हा अपघात न दाखवता पोलीस ठाण्यात त्याला मनोरुग्ण घोषित करून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रामदास हा मनोरुग्ण असून गेल्या सहा महिन्यापासून तो वेड्यागत करत असल्याचा जबाब रामदास याचे चुलत बंधू जनार्दन गवाणे यांनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, रामदास गवाणे याने आत्महत्या केल्याचीच चर्चा शेरेवाडीसह कुमठे परिसरात सुरु आहे. 
  काही ग्रामस्थांमधून नाव न सांगण्याच्या अटीवर मिळालेल्या माहितीनुसार, रामदास गवाणे हा मनोरुग्ण नसून त्याचा गेल्या दोन दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून वाद सुरु होता. गुरुवारी सकाळी हि रामदास हा हातात कुऱ्हाड घेऊन वाद घालत असल्याने याची माहिती बोरगाव पोलिसांना देण्यात आली होती. बोरगाव पोलीस हे शेरेवाडीमध्ये गेल्यानंतर रामदास गवाणे याला चौकशीसाठी बोरगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. रामदास याचे वडील अनंत गवाणे हे शेरेवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आहेत. दरम्यान, रामदास याच्या मृत्यूनंतर शेरेवाडीसह कुमठे गावात अनेक चर्चाना उधाण आले आहे. रामदासने कौटुंबिक वादाला कंटाळून पोलीस ठाण्यातून बाहेर पडत एसटीखाली आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, पोलीस ठाण्याबाहेर झालेल्या घटनेने प्रकरण वाढू नये, म्हणून रामदासला मनोरुग्ण ठरवत हा आकस्मित मृत्यू असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे का? असा प्रश्न ही ग्रामस्थांना पडला आहे. मात्र, रामदास हा मनोरुग्ण असल्याचे त्याची पत्नी, मुलगा आणि चुलत बंधू जनार्दन यांनी सांगितले, असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 
पण रामदासचा मृत्यू एसटीबसला धडकून झाला असेल तर मग तो आकस्मित कसा? हा अपघात होत नाही का? कि आत्महत्या लपविण्यासाठी असा बनाव करण्यात आला, अशा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला