उर्फीनं सांगितलं तोकडे कपडे घालण्याचं कारण
चित्रा वाघ म्हणतात, सगळ्या ॲलर्जीवर…Satara News Team
- Mon 9th Jan 2023 04:07 pm
- बातमी शेयर करा
सोलापूर: मॉडेल उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद काही थांबता थांबताना दिसत नाही. उर्फीने तोकडे कपडे का घालते? याचं कारण सांगितलं. पूर्ण कपडे घातल्याने आपल्याल ॲलर्जी होते. अंगावर पुरळ येतात असं तिने म्हटलं होतं. त्यासाठी तिने फोटोही शेअर केले होते. मात्र, त्यावरून चित्रा वाघ यांनी उर्फीला चांगलेच फटकारले आहे. आम्ही तुझ्या सगळ्या ॲलर्जीवर उपचार करू, असा इशाराच चित्रा वाघ यांनी दिला आहे. तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही टीका केली आहे.
चित्रा वाघ यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन उर्फीला फटकारलं. व्यक्ती स्वातंत्र्य आहे. स्वैराचार नाही. फॅशन व नांगनाच यात फरक आहे. ऐकलं तर ठीक. नाही तर आम्ही सगळ्या अलर्जीवर उपचार करू, असा इशारा देतानाच नागडी उगडी फिरते तिच्यावर कारवाई नाही. मात्र मला नोटीस पाठवली गेली, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.
एका आईने मला एसएमस पाठवला होता. त्यामुळे मी उर्फी विषयावर बोलले. मुली कोणाचा आदर्श घेणार? महाराष्ट्रात हे चालणार नाही. आधी कपडे घाला. मग ठरवा, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
यावेळी त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही टीका केली. चाकणकर तुमचा पेपर सुप्रियाताईंच्या दरबारात सोडवा. अभ्यास… अभ्यास करू नका. मीही यापूर्वी आयोगावर होते. आपण आता आलात. तुम्ही नोटीस दिली त्याला उत्तर दिले आहे. ते उत्तर पण प्रसिद्ध करा. आयोगाला उत्तर दिले रुपाली चाकणकर या व्यक्तीला नाही. आयोग उत्तम काम करीत आहे व्यक्तीवर आक्षेप आहे, असं त्यांनी सांगितलं.

विकृतीला हद्दपार करा. राजकारण करण्यासाठी ज्यांनी उड्या मारल्या त्यांना आम्ही गूळ खोबरे देऊन बोलावले नव्हते, असा टोला त्यांनी लगावला. सुप्रियाताई ही विकृती थांबण्यास सांगत आहेत. त्यांना दिसत नाही का?, असा सवालही त्यांनी केला.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ व्हायरल करून त्यांच्याविरोधातील षडयंत्रावर भाष्य केलं आहे. त्यावरही चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जितेंद्र आव्हाड यांनी आत्मचिंतन करावे.महाविकास आघाडी सरकार काळात आमच्यावर किती खोटे गुन्हे दाखल केले. तेव्हा आम्ही काही बोललो नाही. आमच्या कुटुंबावर गुन्हे दाखल केले तेव्हा आम्ही आमचा संविधानवर विश्वास आहे हेच सांगत होतो, असं त्या म्हणाल्या.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Mon 9th Jan 2023 04:07 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Mon 9th Jan 2023 04:07 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 9th Jan 2023 04:07 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 9th Jan 2023 04:07 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 9th Jan 2023 04:07 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 9th Jan 2023 04:07 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Mon 9th Jan 2023 04:07 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 9th Jan 2023 04:07 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 9th Jan 2023 04:07 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Mon 9th Jan 2023 04:07 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Mon 9th Jan 2023 04:07 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 9th Jan 2023 04:07 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Mon 9th Jan 2023 04:07 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Mon 9th Jan 2023 04:07 pm











