ऑनलाइन पार्टटाइम नोकरीचा मेसेज मोबाइलवर पाठवून परप्रांतियाला साडेपाच लाखांचा गंडा

सातारा : ऑनलाइन पार्टटाइम नोकरीचा मेसेज मोबाइलवर पाठवून, वेगवेगळ्या टास्कवर रक्कम भरून घेत, नागराजू शंकरराव पेरुवाला (सध्या रा. संगमनगर, सातारा, मूळ रा. तेलंगणा) यांना साडेपाच लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला.
  या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      या प्रकरणी नागराजू पेरुवाला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हा प्रकार दि. 5 ते 7 मार्च दरम्यान घडला. नागराजू पेरुवाला हे घरी असताना त्यांच्या मोबाइलवर दुसऱ्या मोबाइलवरुन ऑनलाइन पार्टटाइम नोकरीबाबत मेसेज आला. त्यामध्ये एक लिंक होती. ही लिंक ओपन केल्यानंतर अज्ञाताने मेसेज करून सांगितले की, तुम्हाला टास्क पूर्ण करायचा आहे. त्यानुसार मोबदला मिळेल. हा टास्क पूर्ण केल्यानंतर काही रक्कम पेरुवाला यांना मिळाली.
       त्यानंतर अज्ञाताने असेच काही टास्क देऊन, पेरुवाला यांना काही रक्कम भरायला सांगितले. त्याप्रमाणे पेरुवाला यांनी रक्कम भरली. त्यानंतर त्यांना कोणताही मोबदला मिळाला नाही. अज्ञाताने प्रोसेसिंग अन्‌ टॅक्‍सची रक्कम भरायलाही सांगितले. अशा प्रकारे पाच लाख 54 हजार रुपये भरून घेत पेरुवाला यांची फसवणूक करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला