श्रीपतराव पाटील हायस्कूल आणि करंजे नगरी दुमदुमली विठुरायाच्या नामस्मरणात..
यशवंत गायकवाड
- Wed 17th Jul 2024 05:39 pm
- बातमी शेयर करा
सातारा: सातारा शहरानजीक करंजेपेठेतील शिक्षण प्रसारक संस्था संचलित,श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्यु.कॉलेज करंजेपेठच्या इयत्ता ५ वी ते ७ वीच्या तुकडीतील विद्यार्थी- विद्यार्थीनींनी वारक-यांचा पोशाख परिधान केला तर त्यांच्या मधीलच काही मुला- मुलींनी विठुराया,रुक्मिणी, संत जनाबाई व मुक्ताबाई यांची रुपे धारण केली होती..
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिंडीचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक अमर वसावे, यशवंत गायकवाड,सॊ. सुनिता देशमुख,सॊ.कविता हेंद्रे आणि सर्व सहकारी शि
क्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि दिंडीतील सेवेकरी विद्यार्थी विद्यार्थीनींच्या हस्ते झाले...
सर्व करंजे नगरी मधून इयत्ता ५ वी ते १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांची विद्यार्थी रुपी "वारकरी दिंडी "करंजे नगरीतून फिरली...त्यामध्ये बाल कीर्तनकार श्रीमद गुजर याने छोटे किर्तन सादर केले.. विद्यालयातील मुला-मुलींनी टाळ मृदंगाच्या साथीने हरी नामाचा गजर केला तर काही मुलींनी फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला त्यामुळे संपूर्ण करंजे नगरी विठुरायाच्या नामस्मरणात दंग होऊन गेली..
या विद्यार्थी रुपी वारकरी दिंडीचे कौतुक शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा वत्सलताई डुबल, उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत, नंदकिशोर जगताप सचिव तुषार पाटील शालासमितीच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण माजी अध्यक्ष प्रतापराव पवार,संचालिका हेमकांची यादव, संचालक चंद्रकांत पाटील, धंनजय जगताप, रविंद्र जाधव तसेच संस्था व शाळेचे हितचिंतक व करंजे ग्रामस्थांनी केले... आणि विद्यार्थी दिंडीच्या कार्यक्रमाची सांगता झाली...
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Wed 17th Jul 2024 05:39 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 17th Jul 2024 05:39 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 17th Jul 2024 05:39 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 17th Jul 2024 05:39 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 17th Jul 2024 05:39 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 17th Jul 2024 05:39 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Wed 17th Jul 2024 05:39 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 17th Jul 2024 05:39 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 17th Jul 2024 05:39 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Wed 17th Jul 2024 05:39 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Wed 17th Jul 2024 05:39 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 17th Jul 2024 05:39 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Wed 17th Jul 2024 05:39 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Wed 17th Jul 2024 05:39 pm











