वर्दीतील दर्दी! कष्टकरी महिलांची दिवाळी गोड करणारे पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर.

दिवाळी सणानिमित्त हॉटेलमध्ये कष्ट करणाऱ्या गरजू महिलांना भेटवस्तूंचे वाटप; माणुसकीच्या कार्याचे परिसरातून कौतुक.

 पुसेसावळी  : दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा आणि आपुलकीचा सण. या सणाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या भावनेतून औंध पोलीस ठाणे अंतर्गत पुसेसावळी दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक मा. सतीश मयेकर यांनी औंध येथील हॉटेलमध्ये कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या गरजू महिलांना दिवाळीनिमित्त भेटवस्तूंचे वाटप केले. त्यांच्या या संवेदनशील आणि माणुसकी जपणाऱ्या उपक्रमामुळे कष्टकरी महिलांची दिवाळी गोड झाली आहे.

         पोलीस अधिकारी म्हटले की, डोळ्यांसमोर येते ती कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी, कर्तव्याची कठोरता आणि शिस्त. मात्र, या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन समाजातील गरजू व्यक्तींच्या सुख-दुःखाची जाणीव ठेवणारे अधिकारीही आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण करतात. सतीश मयेकर यांनी दिवाळीनिमित्त केलेल्या मदतीतून याच माणुसकीचे दर्शन घडविले. दिवस-रात्र मेहनत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कष्टकरी महिलांना सणासुदीच्या काळात आनंदाचा छोटासा क्षण मिळावा, या भावनेतून त्यांनी भेटवस्तू देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या कृतीतून केवळ मदतीचा हातच नव्हे, तर समाजातील कष्टकरी वर्गाप्रती असलेली संवेदनशीलताही दिसून आली.

              पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावताना सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सतीश मयेकर यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. खऱ्या अर्थाने सणाचा आनंद हा दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यात असतो, याची जाणीव करून देणारा हा उपक्रम ठरला. वर्दीतील कर्तव्यनिष्ठ अधिकारी आणि मनातील माणुसकी जपणारा संवेदनशील व्यक्ती, अशा दुहेरी भूमिकेतून सतीश मयेकर यांनी ‘वर्दीतील दर्दी’ ही भावना आपल्या कृतीतून अधोरेखित केली आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे दिवाळीच्या प्रकाशासोबत माणुसकीचा उजेडही समाजात पसरला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला