जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेबेवाडीत राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत जनजागृती; शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

ढेबेवाडी : पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ढेबेवाडी येथे राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करत जंतसंसर्गापासून बचाव आणि आरोग्यविषयक जागरूकतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

  या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रूपाली लक्ष्मण गोसावी, उपशिक्षिका सौ. इंद्रायणी राजेंद्र कदम, सौ. स्वाती संदीप पाटील, सौ. प्रियंका महादेव सनदी, सौ. स्वप्नाली रमेश बहिरम तसेच अंगणवाडी सेविका विद्या कारंडे उपस्थित होत्या. यावेळी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे, त्यांची शारीरिक वाढ व शैक्षणिक प्रगती चांगली व्हावी, यासाठी राष्ट्रीय जंतनाशक दिनासारखे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतात. शाळेतील शिक्षक व अंगणवाडी सेविकांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला